काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील चेहरा सतेज पाटील एवढं का बरं संतापले.थेट शाहू छत्रपतींसमोर सतेज पाटलांनी नाराजी का व्यक्त केली. त्याचं झालं असं की, उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अवघी 10- 12 मिनिटं असताना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर सतेज पाटीलांचा झालेला हा संताप अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला. कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजेंनी माघार घेतली आणि कोल्हापुरात नवा वाद रंगला. मात्र मधुरिमाराजेंनी माघार का घेतली याची इनसाईड स्टोरी आम्ही दाखवणार आहोत.पाहूया
शाहू छत्रपती, मालोजीराजे आणि मधुरिमाराजेंनी घेतली लाटकरांची भेट
माझ्या मुलाला शाहू छत्रपती न्याय देतील का? लाटकरांच्या वडिलांचा सवाल
सुनेचा अर्ज माघारी घेऊन पाठिंबा देऊ शकतो-शाहू छत्रपतींचा शब्द
शाहू छत्रपतींनी लाटकरांच्या वडिलांना दिला अर्ज मागे घेण्याचा शब्द
मधुरिमाराजेंनी अर्ज मागे घेत राजेश लाटकरांना दिला पाठिंबा
यावर कोल्हापूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी प्रतिक्रिया दिली,तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढताना सतेज पाटील मात्र भावूक झाले. यावर छत्रपती शाहू महाराजांनी प्रसिद्धीपत्रकातून जाहीरपणे नेमकी काय भूमिका मांडली ते पाहूयात.
सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठीच माघार
कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नाही
त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून मधुरीमाराजेंची माघार
सतेज पाटील आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत
अपक्ष उमेदवार राजेश लाटकरांसाठी ताकतीने प्रयत्न करणार
खासदारकीच्या राजीनाम्याबाबत अफवा असून यात तथ्य नाही
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. ऐन निवडणुकीत अधिकृत उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावल्यानं काँग्रेस नेते सतेज पाटलांनी संताप व्यक्त केला. याआधीही कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी कापल्यानं विद्यमान आमदार जयश्री जाधवांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.उमेदवारीच्या या नाटकात काँग्रेसचं मात्र राज्यभर हसू झालं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.