Video : मुंबईकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ; भाज्या धुण्यासाठी गटाराचं पाणी, व्हिडिओ व्हायरल

mumbai mankhurd viral video : मुंबईकरांना सावध करणारी बातमी आहे...तुमच्या घरात येणा-या हिरव्या पालेभाज्या स्वच्छ आहेत का ? भाजी विक्रेता काही चुकीचं तर करत नाही ना..याची खात्री करा. कारण सवाल तुमच्या आरोग्याचा आहे. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी पाहा सामचा हा खास रिपोर्ट
मुंबईकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ; भाज्या धुण्यासाठी गटाराचं पाणी
mumbai mankhurd viral video Saam tv
Published On

मुंबई :

मुंबईत रेल्वे रुळालगत अस्वच्छ पाण्यावर सर्रासपणे भाजीपाल्याची शेती केली जात असल्याचा प्रकार तुम्ही पाहिला असेलच....पण आता मुंबईतल्या भाजीबाजारातल्या भाज्यांमागचं काळ सत्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. डोळ्यांना दिसणा-या या हिरव्या भाज्या नव्हे तर तुम्हाच्या आरोग्याला घातक ठरणारं हिरवं विष आहे. याचाच पर्दाफाश करणारा आम्ही तुम्हाला एक व्हिडीओ दाखवणार आहोत...जो पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही....

पांढरा टी-शर्ट घातलेला भाजीपाला विक्रेता...ग्राहकांच्या आरोग्याची तमा न बाळगता चक्क गटाराच्या पाण्यात भाज्या धूत आहे. त्याच्याकडील कोथिंबीर आणि इतर पालेभाज्या तो या घाणेरड्या पाण्यात धुवून विकण्यासाठी ठेवतोय.

मुंबईकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ; भाज्या धुण्यासाठी गटाराचं पाणी
Viral Video: अगं हो हो थांब जरा...! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेने माधुरीच्या गाण्यावर केला भन्नाट डान्स; बेबी शॉवरचा VIDEO व्हायरल

पाहा पुन्हा एकदा....हा संतापजनक प्रकार मानखूर्द भागातला आहे. गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार मुंबईतील मानखुर्द भाजी मार्केट परिसरातला आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर भाजी मार्केट परिसरातील हा प्रकार मार्केट मधून जात असलेल्या एका सजग नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. बिस्मिल्ला एस. के. या नागरिकानं सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करून मुंबई आणि ट्रॉम्बे पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

मुंबईकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ; भाज्या धुण्यासाठी गटाराचं पाणी
Mouthwash Side Effects Fact Check : माऊथवॉशमुळे कॅन्सरचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

पाणीपुरी किंवा रस्त्यावरील इतर खाद्यपदार्थांमध्ये असलेली अस्वच्छता याची जाणीव काही घटनांमधून तुम्हाला झाली असलेच...मात्र तुमच्या घरात येणारी भाजीही स्वच्छ आहे का याची खात्री कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे योग्य ठिकाणी आणि काळजीपूर्वक भाजीची खरेदी करा कारण सवाल तुमच्या आरोग्याचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com