Monsoon Health : पावसाळ्यात आजारांना पळवून लावणार 'ही' भाजी, वाचा जबरदस्त फायदे

Green Beans Benefits : मुसळधार पावसामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशात चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
Green Beans Benefits
Weight LossSAAM TV
Published On

पाऊस अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेत. पावसाळ्यात रोजच्या जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आढळतात. जे आजाराशी लढायला ताकद देतात. पावसाळ्यात येणारी फरसबी भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. मात्र अनेकजण या भाजीचे नाव ऐकताच नाक-तोंड मुरडतात. चला तर मग अशा बहुगुणी भाजीचे फायदे जाणून घेऊयात.

हृदयाचे आरोग्य

फरसबीमध्ये फ्लेवोनोइड्सचे प्रमाण जास्त असते. जे तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. फरसबीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवतो. यामुळे हृदय विकारांचा धोका कमी होतो.

मधुमेह

फरसबी मधील बिया मधुमेहावर रामबाण उपाय आहे. यातील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांनी आपल्या डाएटमध्ये या भाजीचा समावेश करावा.

मजबूत हाडे

फरसबीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे पावसाळ्यातील वातावरणामुळे होणारी सांध्येदुखी कमी होऊन हाडे मजबूत होतात. फरसबीमुळे मोठ्या प्रमाणात हाडांची झीज थांबते.

डोळ्याचे आरोग्य

फरसबीमधील कैरोटिनॉइड डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास मदत करते. डोळ्यांवरील ताण कमी करून डोळ्यांना आराम मिळतो

Green Beans Benefits
Brinjal Benefits : नावडती वांग्याची भाजी आरोग्यासाठी एकदम बेस्ट! फायदे वाचून थक्क व्हाल

पचनक्रिया सुधारते

पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. अशावेळी नियमित आहारात फरसबीच्या भाजीचा समावेश केल्यास पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात. फरसबीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुरळीत करते. बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होत असल्यास फरसबी खावी. फरसबीमधील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म शरीराची सूज आणि इन्फ्केशन कमी करण्यास मदत करतात. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायचे असल्यास फरसबी शिजवून त्यात मीठ घालून त्यांचे सेवन करावे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Green Beans Benefits
Iron Tonic : अशक्तपणा कायमचा होईल दूर; आजपासून आहारात 'या' ज्यूसचा समावेश करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com