Iron Tonic : अशक्तपणा कायमचा होईल दूर; आजपासून आहारात 'या' ज्यूसचा समावेश करा

Health Tips : काही व्यक्तींना कॅल्शिअम, हिमोग्लोबीन आणि रक्त देखील कमी असतं. आता यामुळे जास्तप्रमाणात अशक्तपणा सुद्धा येतो. तो दूर करण्यासाठी आम्ही काही ज्यूसची यादी आणली आहे.
Health Tips
Iron TonicSaam TV
Published On

आयर्न, व्हिटॅमीन आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. शरीरात याची कमी असल्यास अनेक आजार बळावतात. विविध समस्यांनी व्यक्ती त्रस्त होतात. काही व्यक्तींना कॅल्शिअम, हिमोग्लोबीन आणि रक्त देखील कमी असतं. आता यामुळे जास्तप्रमाणात अशक्तपणा सुद्धा येतो. तो दूर करण्यासाठी आम्ही काही ज्यूसची यादी आणली आहे. हे ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरीरातील अशक्तपणा कायमचा दूर होईल.

Health Tips
Iron Deficiency : महिलांनो, झोपेत अचानक हात-पाय थंड पडताय? असू शकते Iron ची कमतरता; या पदार्थांचे सेवन लगेच करा

बीट ज्यूस

बीटमध्ये भरपूर आर्यन असते. तसेच याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमी पूर्ण होते. शरीरातील रक्त वाढवण्यासाठी देखील तुम्ही या ज्यूसचे सेवन करू शकता. त्यासाठी बीट छान सोलून घ्या. त्यानंतर यामध्ये साखर, दूध मिक्स करून मिक्सरला ब्लेंड करून घ्या. अशा पद्धतीने हा ज्यूस तुम्ही रोज पिऊ शकता. त्याने तुमचा अशक्तपणा कमी होईल.

पालक ज्यूस

पालकची भाजी अनेक व्यक्ती खात नाहीत मात्र ती आरोग्यासाठी फार पोषक आहे. पालकमध्ये विविध जिवनसत्व असतात. त्यामुळे तुम्ही देखील पालकच्या पानांचा रस प्यायला पाहिजे. त्यासाठी पालकची पाने घ्या. त्यामध्ये एक सफरचंद देखील मिक्स करा. फक्त पालकच्या पानांची चव अनेकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पालक आणि सफरचंदाचा ज्यूस पिऊ शकता.

डाळिंबाचा रस

डाळिंबामध्ये व्हिटॅमीन सी, एंटीऑक्सीडेंट आणि आर्यन सुद्धा असतं. त्यामुळे तुम्ही डाळिंबाचा ज्यूस पिऊ शकता. डाळिंबाचा ज्यूस बनवताना डाळिंब आणि दूध एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात चविसाठी अगदी थोडं मीठ किंवा चाट मसाला तुम्ही टाकू शकता.

संत्री आणि गाजर ज्यूस

संत्रीमध्ये देखील व्हिटॅमीन सी आहे. तर गाजर आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला अशक्तपणासह डोळे दुखणे, डोकं दुखणे अशा समस्या होत असतील तर तुम्ही आजपासूनच संत्री आणि गाजर ज्यूस पिण्यास सुरुवात केली पाहिजे.

काळे तीळ, मध

काळ्या तिळांमध्ये आयर्न असते. तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात काळे तीळ आणि मध मिक्स करून हे ड्रिंक सुद्धा पिऊ शकता. आपल्या आरोग्यासाठी हे फार फायदेशीर आहे.

टीप : ही सामान्य माहिती आहे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

Health Tips
Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com