Iron Deficiency : महिलांनो, झोपेत अचानक हात-पाय थंड पडताय? असू शकते Iron ची कमतरता; या पदार्थांचे सेवन लगेच करा

Iron Deficiency Symptoms : झोपेत हातापायांना मुंग्या येणे, थंड पडणे किंवा हात-पाय उचलण्यास जडपणा येतो. अशावेळी नेमके काय करायचे हे आपल्याला माहित नसते.
Iron Deficiency
Iron DeficiencySaam Tv
Published On

Does Iron Deficiency Cause Cold Hands And Feet : बरेचदा वातावरणात गारवा असला की, आपले हात पाय थंड पडतात. वातावरण दमट असले तरी झोपेत हातापायांना मुंग्या येणे, थंड पडणे किंवा हात-पाय उचलण्यास जडपणा येतो. अशावेळी नेमके काय करायचे हे आपल्याला माहित नसते.

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण आपल्या लाइफमध्ये व्यस्त आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, आरोग्याकडे दुर्लक्ष व इतर अनेक समस्यांना आपण बळी पडतो. जर तुमचे ही हात पाय वारंवार थंड पडत असतील तर शरीरात लोहाची कमतरता असू शकते. हा त्रास विशेषत: महिलांना अधिक असतो. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

Iron Deficiency
Long Hair Care Tips: कंबरेपर्यंत लांब-घनदाट केस हवेत? स्वयंपाकघरातील हे ३ पदार्थ संजीवनी, महिन्याभरात केस वाढतीलच!

1. शरीरात लोहाच्या कमतरतेची लक्षणे

  • हात आणि पाय थंड पडणे

  • थकवा किंवा अशक्तपणा

  • फिकट गुलाबी त्वचा

  • श्वास घेण्यात अडचण

  • चक्कर येणे

  • नखे फुटणे

  • केस गळणे (Hair Falls)

  • लाल रक्तपेशी कमी होणे

  • घसा खवखवणे

  • छातीत दुखणे (Chest Pain)

  • हृदयाचे ठोके जलद होणे

2. लोहाच्या कमतरतेमुळे आरोग्यावर (Health) परिणाम

शरीरातील रक्ताच्या कमतरतेचे कारण हे लोहाचे प्रमाण असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला कळायला हवे. लोह हा रक्त वाढीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. लाल रक्तपेशींद्वारे ऑक्सिजन संपूर्ण शरीरात जाते. म्हणूनच लोहाचा पुरवठा योग्य रीतीने होत नसले तर शरीरातील लाल रक्तपेशी वाढत नाही त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

Iron Deficiency
Kidney Stone Treatment: किडनी स्टोन झालाय ? आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा

3. या पदार्थांनी वाढेल शरीरातील लोहाचे प्रमाण

लोह अनेक पदार्थांमधून आपल्याला मिळते. पालक, हिरवा वाटाणा, सोयाबीन, ब्रोकोली यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लोह असते आणि ते खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते. तसेच अंडी, मासे, चिकन खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com