vishwajeet kadam assures mp vishal patil will join maha vikas aghadi  Saam Digital
लोकसभा २०२४

विशाल पाटील महाविकास आघाडी साेबत जाणार, विश्वजीत कदमांनी दिला शब्द

विजय पाटील

सांगलीच्या जनतेने ठरवून दाखवले की इथे विश्वजीत कदम काय करू शकतो असा जणू इशाराच काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयानंतर विरोधकांना दिला. दरम्यान विशाल पाटील हे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे खासदार असतील असा विश्वास देखील विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विमान आणि पायलट याची चर्चा जोरदार रंगली होती. विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांना आपलं पायलट आहेत ते कुठे घेऊन जातील तिकडे माझं विमान उतरेल असे म्हटले होते. याच्यावरूनच राजकारण तापले होते. तर दुसरीकडे विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. तर वाघाची डरकाळी सुद्धा सांगलीच्या उमेदवारीवरून फोडण्यात आली होती.

मंगळवारी निकाला दिवशी विशाल पाटील यांनी माेठं मताधिक्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला जात हाेता. काँग्रेस कमिटीवर विमानाचा पोस्टर लावत जल्लोष सुरु झाला आणि दुसरीकडे विश्वजीत कदम हेलिकॉप्टरने सांगलीत आले. ते पाेहचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम यांना खांद्यावरती घेत विशाल पाटलांच्या विजयाच्या घाेषणा दिल्या.

विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाईलाजाने आपल्याला ही भूमिका घ्यावी लागली असे स्पष्ट केले. ते म्हणाले विशाल पाटलांचा विजय हा सांगलीकर जनतेचा आणि काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्याचा विजय आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Chandrapur News : अवैध धंदे रोखण्यासाठी चकपिरंजी ग्रामसभेत अनोखा ठराव; शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी टाकली अट

SCROLL FOR NEXT