Grapes Cleaning: तुम्ही द्राक्षे धुवून लगेच खाताय का? व्यवस्थित स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

How To Clean Grapes Properly: सध्या बाजारात द्राक्ष दाखल झाली आहे. द्राक्ष स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यावरील रासायनिक पदार्थांमुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.
Grapes Cleaning
Grapes CleaningSaam Tv
Published On
Summary

द्राक्ष धुण्याची योग्य पद्धत

द्राक्षांवरील रासायनिक पदार्थांनी होऊ शकतात आजार

अशा पद्धतीने धुवा द्राक्ष

सध्या द्राक्षांचा सीझन सुरु झाला आहे. बाजारात द्राक्ष दाखल झाली आहेत. द्राक्ष खाणे हे शरीरासाठी खूप चांगले असतात. आंबट-गोड द्राक्ष ही सर्वांनाच आवडतात. अनेकांच्या घरी द्राक्ष आणली जातात. दरम्यान, द्राक्ष स्वच्छ धुवून खाणे खूप गरजेचे असते. द्राक्षांवर खूप जास्त रासायनिक पदार्थांचा फवारा केला जातो. त्यामुळे द्राक्ष स्वच्छ धुणे गरजेचे आहे.

Grapes Cleaning
Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

द्राक्षांवरील रासायनिक पदार्थांच्या फवाऱ्यामुळे तुम्हाला आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळेआधीच काळजी घ्यायची असते. त्यासाठी फक्त पाणी टाकून द्राक्ष धुणे योग्य नाही. फक्त पाण्याने द्राक्षावरील केमिकल निघून जात नाही. द्राक्ष धुण्याची योग्य पद्धत वाचा.

द्राक्ष धुण्याची योग्य पद्धत (How to Wash Grapes)

द्राक्ष नेहमी थंड पाण्याची धुवा. एका बाउलमध्ये द्राभ घ्या. ती नळाच्या पाण्याखाली धरा. २०-३० सेकंदासाठी द्राक्ष तशीच राहू द्या. यानंतर हाताने द्राक्ष धूवून घ्या. जेणेकरुन त्यावरुल धुळ सर्व निघून जाईल.

बेकिंग सोडा वापरा (Baking Soda)

तुम्ही द्राक्ष किंवा कोणतीही इतर फळे धुण्यासाठी बेकिंग सोडा वापरु शकतात. रिसर्चमधून समोर आले आहे की, बेकिंग सोडा किंवा सोडियम बायोकार्बोनेटमुळे केमिकल निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही द्राक्ष धुताना त्यावर बेकिंग सोडा टाका. त्यानंतर १०-१५ मिनिटे हलक्या हाताने चोळून घ्या. यानंतर पुन्हा स्वच्छ धुवून घ्या.

Grapes Cleaning
Microplastics And Cancer: तरूणांमध्ये अचानक का वाढतायत कॅन्सरची प्रकरणं; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

विनेगर (Vinegar)

विनेगर टाकल्यावरदेखील सर्व केमिकल निघून जाते. तुम्हाला विनेगर आणि पाणी मिक्स करायचे आहे. त्यात द्राक्ष दहा मिनिटे ठेवायची आहेत. यानंतर विनेगरचा वास जाईपर्यंत स्वच्छ धुवून घ्या.

Grapes Cleaning
Yoga For Mental Health: मानसिक आरोग्य नीट राहावं म्हणून कोणती योगासने करावीत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com