Badlapur MIDC
Badlapur MIDCSaam tv

Badlapur : एमआयडीसीतील कंपनीतून रासायनिक धूर; बदलापुरात रात्रीच्या वेळेस वायू प्रदूषण, नागरिकांना त्रास

Badlapur News : हवेच्या प्रदूषणाचा त्रास नेहमीच बदलापूरमधील नागरिकांना होत असतो. यात पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास कंपनीतून वायू सोडण्यात आल्याने हवेचे प्रदूषण झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला
Published on

मयुरेश कडव 
बदलापूर
: बदलापूरच्या एमआयडीसी परिसरात काल रात्रीच्या सुमारास पुन्हा वायू प्रदूषण झाल्याचे पाहण्यास मिळाले. एमआयडीसी परिसरातील एका अज्ञात कंपनीने रात्रीच्या वेळी रासायनिक वायू हवेत सोडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वारंवार होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे बदलापुरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बदलापूर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून या कंपन्यांमार्फत वारंवार नियमांचे उल्लंघन करून वायु प्रदूषण केले जातं आहे. अनेकदा रासायनिक वायू हवेत सोडला जात असल्याने वायू प्रदूषणाची समस्या निर्माण होत असते. यातच काल रात्रीच्या सुमारासही एका कंपनीतुन हवेत रासायनिक वायू सोडल्यामुळे कात्रप, आपटेवाडी, शिरगाव परिसरातील वातावरण धुरकट झालं होतं. तसेच दृश्यमानताही कमी झाली होती. 

Badlapur MIDC
Nanded Police : पोलीस निरीक्षकाकडून होमगार्डला मारहाण; फोटो झाले व्हायरल

नागरिकांना त्रास 

हवेत मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू पसरल्याने हवेचे प्रदूषण निर्माण झाले होते. या रासायनिक धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यासही त्रास झाला होता. रात्रीचा अंधार असल्याने नेमका कोणत्या कंपनीतून रासायनिक वायू सोडण्यात आला; हे समजू शकले नाही. अशाच प्रकारे हवेत वायू सोडला जात असल्याची समस्या बदलापूरकरांना अनेकदा भेडसावत असते. 

Badlapur MIDC
Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

तक्रार करूनही दुर्लक्ष 

बदलापूर एमआयडीसीतील वायू प्रदूषणाबाबत वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरच नागरिकांनी सवाल उपस्थित केले आहेत. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासोबत प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी; अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com