Kolhapur Loksabha Election satej patil  
लोकसभा २०२४

Loksabha Election: कोल्हापूरमध्ये सतेज पाटील ठरणार किंगमेकर? कोल्हापुरात कुणाचा कंडका पडणार?

Kolhapur Loksabha Election: मोदी, शाहा, शिंदे, फडणवीसांनी सभा घेऊनही सतेज पाटलांची रणनितीच वरचढ ठरल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

कोल्हापूर लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती उमेदवार आहेत. मात्र सतेज पाटलांनी ही लढाई प्रतिष्ठेची केलीय. मोदी, शाहा, शिंदे, फडणवीसांनी सभा घेऊनही सतेज पाटलांची रणनितीच वरचढ ठरल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलंय. त्यामुळे सतेज पाटलांचं राजकारण पुन्हा चर्चेत आलंय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.

सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेली कोल्हापूरची लढाई शाहू छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक यांच्यात जोरदार चुरस रंगली. पण खरी प्रतिष्ठा पणाला लागली ती काँग्रेसच्या सतेज पाटील यांचीच.गोकूळ दुध संघ, कोल्हापूर जिल्हा बँक, साखर कारखान्याची निवडणूक असो वा विधानपरिषद, विधानसभा ते आताची लोकसभा निवडणूकीची सूत्र सतेज पाटलांभोवती फिरतात.

2014 मध्ये मोदी लाट असतानाही सतेज पाटलांनी आपली ताकद धनंजय महाडिक यांच्य़ा पाठीशी उभा केली आणि महाडिकांनी बाजी मारली. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाडिक आणि पाटील एकमेकांविरोधात उभे ठाकले. एवढंच नाही तर 2019 च्या लोकसभेत आघाडी धर्माला तिलांजली देत आमचं ठरलंय म्हणत संजय मंडलिक यांच्यामागे आपली ताकद उभी केली.

संजय मंडलिक यांच्यामागे आपली ताकद उभी केली आणि मंडलिक विजयी झाले. मात्र त्यानंतर महाडिक भाजपवासी झाल्याने कोल्हापूरमध्ये राजकीय समीकरण बदललं. तर त्यानंतर चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत सतेज पाटलांनी जयश्री जाधवांच्या विजयासाठी जोर लावत विजयश्री खेचून आणली.

तर आता महाविकास आघाडीत कोल्हापूरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा होता. मात्र सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि मविआनं एकमतानं स्वीकरला. त्यात शाहू महाराजांनी उमेदवारीसाठी काँग्रेसची निवड केल्यामुळे सतेज पाटलांची रणनीती यशस्वी झाली.

त्यात हातकणंगलेतही ठाकरे गटाच्या उमेदवारासाठीही त्यांनी ताकद उभी केली. एक्झिट पोलच्या अंदाजात या दोन्ही मतदारसंघात मविआचं पारडं जड दिसतंय. कोल्हापुरात पंतप्रधान मोदी, अमित शाहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभांचा धडाका लावला होता.मात्र सतेज पाटलांनी आपल्या प्रचार यंत्रणेतून प्रभाव दाखवून दिला. आता निकालात बाजी मारली तर केवळ कोल्हापुरातच नव्हे तर पाटलांचं दिल्ली दरबारीही वजन वाढणार एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT