Loksabha Election: सांगलीत मशाल की विशाल? कोणाची राहणार पाटीलकी?

Sangali Loksabha Election : काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांचा विजय होण्याचा अंदाज एक्झिट पोलने दिल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते एकमेकांसमोर आले आहेत. नाना पटोले आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल केलाय.
Loksabha Election: सांगलीत मशाल की विशाल? कोणाची राहणार पाटीलकी?
Sangali Loksabha Election

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

काही तासांत लोकसभेचा निकाल येणार आहे. मात्र मविआतला सांगलीवरून सुरू झालेला वाद शमायला तयार नाही. सांगलीत काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांवरून पुन्हा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपलीय. राऊत आणि नाना पटोलेंनी थेट एकमेकांचं गोट्या खेळणं काढलंय. यावरचा हा रिपोर्ट..

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळतंय. सांगलीमध्ये अपक्ष आमदार विशाल पाटील हेच बाजी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येतोय. सांगलीत यंदा तीन पाटलांमध्ये थेट लढत झाली. भाजपनं संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर, काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष चंद्रहार पाटील आणि संजयकाका पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला.अशात काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी अप्रत्यक्षपणे मित्र विशाल पाटलांसाठी जिवाचं रान केल्याची चर्चा सांगलीसह राज्यात रंगली. विशाल पाटलांना एक्झिट पोलमध्ये आघाडी मिळताना दिसतेय. त्यामुळे विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांचा विमान दिल्लीला लॅण्ड केल्याचं बोललं जात आहे. यावरून खासदार संजय राऊतांनी इशारा दिलाय. तर नाना पटोलेंनीही राऊतांना टोला लगावलाय.

सांगलीतील जागा विशाल पाटलांनी पटकवल्यास मविआतील बेबनाव आणखी वाढताना दिसेल..आगामी विधानसभेत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.

Loksabha Election: सांगलीत मशाल की विशाल? कोणाची राहणार पाटीलकी?
Sangli Lok Sabha : कोण होणार सांगलीचा 'पाटील'? बंडखोरी पथ्यावर पडणार की महाराष्ट्र केशरी 'काकां'चा डाव पालटणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com