Sanjay Raut News: 'महाराष्ट्र लुटण्यासाठीच आमदार-खासदार फोडले..' संजय राऊत बरसले; अजित पवारांवर हल्लाबोल

Maharashtra Politics: "ज्यांनी गुलामी पत्करली आहे, जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण आहेत हे 2024 ला कळेल..." असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics
Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics Saam TV

मयुर राणे, मुंबई|ता. १ जानेवारी २०२४

Sanjay Raut News:

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटासोबत जाणार होते, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. संजय शिरसाट यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

बेईमान होते ते निघून गेले..

"जयंत पाटील कालंच मातोश्रीवर होते. अशा प्रकारच्या बातम्या व अफवा पसरवून काही उपयोग नाही. ज्यांना जायचं होतं, डरपोक, बेईमान लोक होते जे निघून गेले. जे थांबले आहेत त्यांना विविध आमिष दाखवली जात आहेत दबाव टाकले जात आहेत. पण ते अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवून काही गोंधळ वगैरे होणार नाही.. असे संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

अजित पवारांवर टीका

"ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण आहेत हे 2024 ला कळेल. महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकारमधले हौसे गौसे नवशे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics
Mumbai-Nashik Expressway: नाशिक-मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

नामर्द सरकार..

"त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही इतकं नामर्द सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झालेले नाही, डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय तर फक्त आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटत आहेत.." अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. (Latest Marathi News)

Sanjay Raut on Ajit Pawar Maharashtra Politics
Politics News: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान; महाराष्ट्रात १ कोटी अँबेसेडर नेमणार, नेमकं कशासाठी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com