Maharashtra Politics: 'जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला..' शिंदे गटातील बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics: जयंत पाटील हे शरीराने तिकडे आहेत मात्र मनाने इकडेच आहेत. ते आले तर येतील मात्र त्यांच्या मुळेच मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. त्या बैठकीला सुप्रिया सुळे ही होत्या..." असेही संजय शिरसाट म्हणालेत.
Jayant Patil News
Jayant Patil NewsSaam Tv
Published On

Sanjay Shirsat News:

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी बंड केल्यापासून राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटातील अनेकांना मंत्रीपदाची आस होती, मात्र हा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. या मंत्रीमंडळ विस्तारावरुन अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतात. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरुन सर्वात मोठे विधान केले आहे.

काय म्हणालेत संजय शिरसाट?

"राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. कारण जयंत पाटील (Jayant Patil) अजित पवारांसोबत येणार होते. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता, तेच शरद पवार साहेबांनाही सांगणार होते.. असा खळबळजनक दावा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील हे शरीराने तिकडे आहेत मात्र मनाने इकडेच आहेत. ते आले तर येतील मात्र त्यांच्या मुळेच मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. त्या बैठकीला सुप्रिया सुळे ही होत्या..." असेही संजय शिरसाट म्हणालेत.

उद्धव ठाकरेंवर टीका...

"उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राममंदिर उद्घाटन सोहळा हा भाजपचा कार्यक्रम असल्याची टीका केली होती. यावरुन संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. राम मंदिर उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम नाही. तुम्ही सर्वांनी सुद्धा आनंदाचा क्षण म्हणून मिठाचा खडा न टाकता आनंदात सहभागी व्हावे. करसेवक सर्व पक्षांचे होते. या सोहळ्याला लीनीटेड करू नका..." असा टोला त्यांनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jayant Patil News
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे महानगरपालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारींमुळे आयुक्तांना पाठवली नोटीस

शरद पवार- प्रकाश आंबेडकरांच्या भेटीवर भाष्य..

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर प्रगल्भ आहेत. त्यांना कळते कुणाला भेटायचे, ते म्हणाले आहे युती करा, मात्र युती झाली नाही तर ते त्यांना जागा दाखवतील, मी सांगतोय आघाडी युती होणार नाही... प्रकाश आंबेडकर त्यांना त्यांची जागा दाखवतील.." अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. (Latest Marathi News)

Jayant Patil News
Koregaon Bhima Vijayastambh: कोरेगाव भिमा विजयस्तंभ आकर्षक फुलांनी सजला; अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com