CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे महानगरपालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारींमुळे आयुक्तांना पाठवली नोटीस

Pune Municipality Commissioner: याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात स्थानिक नगरसेवक नसणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामांकडे दुर्लक्ष होणे अशा तक्रारी नागरिकांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्यात.
CM eknath shinde
CM eknath shinde Saam TV

Pune News:

पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बरीच विकासकामे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींनाचा सामना करावा लागतोय. कामे पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी आपल्या अडचणीचा पाढा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे वाचला आहे. ऑनलाईन आणि पत्र व्यवहार करत नागरिकांनी विकासकामांबाबत तक्रार केलीये. नागरिकांची होणारी गैरसोय पाहून मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM eknath shinde
Mumbai Maha Swachata Abhiyan | मुंबईत आज महास्वछता अभियान, CM Eknath Shinde करणार अभियानाला सुरुवात

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात स्थानिक नगरसेवक नसणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामांकडे दुर्लक्ष होणे अशा तक्रारी नागरिकांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्यात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे महानगरपालिका आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

गेल्या काही काळापासून पुण्यातील विविध समस्या मार्गी लावण्यात आलेल्या नाहीत. यासह केलेल्या तक्रारींची व्यवस्थित दखल घेण्यात येत नाहीये. त्यामुळे नागरिकांनी थेट ऑनलाइन पद्धतीने तक्रारी दाखल केल्यात. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहेत.

तक्रारींवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री सचिवालय आणि कार्यालयाकडे आलेले अर्ज आणि निवेदनांची यादी करण्यात आलीये. ही यादी टोकन नंबरसह सबंधित सरकारी कार्यालयांना पाठवण्यात आली आहे. संबंधित कार्यालयांनी प्रलंबित कामांमध्ये केलेली कार्यवाही आणि अर्जदारास दिलेले उत्तर कार्यालयास सादर करावे, असा आदेश जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना देण्यात आलाय.

CM eknath shinde
Mumbai Crime News : मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची शक्यता, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com