महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांवर पाच टप्प्यात मतदान पार पडलं. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. येत्या ४ जून रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी, नेमकी कुणाची जादू चालणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. अशातच आश्चर्यचकित करणारी आकडेवारी समोर आली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांना फक्त २८ जागांवरच विजय मिळणार, असा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीने एकूण ४१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना १४ जागांचं नुकसान होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एनडीएच्या जागा घटल्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ राज्यात केवळ ६ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आघाडीत सामील झाल्याने त्यांना २० जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज सट्टाबाजाराने बांधला आहे.
सट्टा बाजाराने मतदारसंघानिहाय उमेदवारांच्या विजयाचा देखील अंदाज बांधला आहे. त्यानुसार, नागपुरातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी लोकसभा निवडणूक जिंकतील अशी शक्यता आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विजयी होतील, असा अंदाज आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नुकसान होणार आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेचे संजय देशमुख येथून निवडणूक जिंकतील, असा अंदाज सट्टाबाजाराचा आहे. अमरावतीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना धक्का बसू शकतो, असंही सट्टाबाजाराचा कल सांगत आहे.
सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी होऊन खासदार होतील, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. भाजपने पीयूष गोयल यांना मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते येथून विजयी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती विजयी होऊ शकतात, असा अंदाज आहे.
Disclaimer: सट्टा बाजाराचे मूल्यांकन परिणाम बरोबर असण्याची शक्यता फारच कमी असते. त्याची आकडेवारी कोणत्याही सर्वेक्षणातून किंवा सर्वेक्षणातून घेतलेली नाही. याची वाचकांनी नोंद घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.