Maharashtra Politics : महाराष्ट्रात ठाकरेंचीच होणार सरशी, महायुतीला मिळणार फक्त १२ जागा? तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Lok Sabha Result Prediction : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचीच सरसी होणार असून, महायुतीला फक्त १२ जागा मिळू शकतात, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात ठाकरेंचीच होणार सरशी, महायुतीला मिळणार फक्त १२ जागा? तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ
Maharashtra Lok Sabha Result PredictionSaam tv
Published On

लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ६ टप्प्यात मतदान पार पडलं. आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी १ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. यानंतर थेट ४ जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता अनेकांना आहे. अशातच राजकीय तज्ज्ञांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

महाराष्ट्रात ठाकरेंचीच होणार सरशी, महायुतीला मिळणार फक्त १२ जागा? तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ
2019 मध्ये एक्झिट पोलचे अंदाज किती ठरले होते खरे? 2024 ची परिस्थिती आहे वेगळी? राज्यात महायुती की मविआ?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २५० जागाही मिळवता येणार नाहीत, असं राजकीय विश्लेषक रवी श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीला २५९ जागा मिळू शकतात, असा दावाही श्रीवास्तव यांनी केला आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सर्वात मोठं नुकसान होईल, असंही ते म्हणाले.

राजकीय विश्लेषक रवी श्रीवास्तव यांनी नुकतीच एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं. श्रीवास्तव म्हणाले, "भाजपला या निवडणुकीत २५० जागाही जिंकता येणार नाहीत. त्यांच्या मित्रपक्षाला जवळपास ३० जागा मिळतील".

भाजपप्रणित एनडीएला लोकसभेच्या एकूण २७० जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडी २५९ जागा जिंकू शकते. ५४३ पैकी २३ जागा इतर पक्षांना जातील, असा अंदाज श्रीवास्तव यांनी बांधला. दक्षिण भारत, दिल्ली आणि बिहारमध्ये एनडीएपेक्षा इंडिया आघाडीला जास्त जागा मिळतील, असंही रवी श्रीवास्तव म्हणाले.

महाराष्ट्रात महायुतीला फक्त १२ जागाच मिळणार?

रवी श्रीवास्तव यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही महत्वाचं भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागांचं नुकसान होईल. महायुतीचे फक्त १२ जागांवरील उमेदवार निवडून येतील. यात भाजपचे ८, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २ उमेदवार निवडून येतील.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे ३६ उमेदवार निवडून येतील. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १६ जागा, काँग्रेसला १४ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ६ उमेदवार निवडून येतील. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचं २९ जागांवर नुकसान होईल, असंही रवी श्रीवास्तव म्हणाले.

दरम्यान, निवडणुकीच्या निकालांबाबत राजकीय विश्लेषकांचे अंदाज नेहमीच अचूक नसतात. मात्र, काही वेळा त्यांनी सांगितलेली आकडेवारी निकालाच्या जवळपास पोहोचते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आतापर्यंत अनेक विश्लेषकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे नेमका कुणाचा अंदाज खरा ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

महाराष्ट्रात ठाकरेंचीच होणार सरशी, महायुतीला मिळणार फक्त १२ जागा? तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ
Lok Sabha 2024: उत्तरप्रदेशमध्ये एका चुकीमुळे भाजपचं आकड्यांचं गणित फसलं? लोकसभा निकालापूर्वी सी-व्होटरने केला मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com