Lok Sabha Election Exit Poll 2024 Result Live: एक्झिट पोलदरम्यान पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; महिला आणि तरुणांचं केलं कौतुक

Maharashtra Exit Poll 2024 Live Updates: NDA vs INDIA: देशातील लोकसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर विविध वृत्तसंसस्थाकडून एक्झिट पोल जाहीर होण्यास काही तास उरलले आहेत. या एक्झिट पोलकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
देशातील जनतेचा मूड काय?
Lok Sabha ElectionSaam tv

PM Narendra Modi : एक्झिट पोलदरम्यान पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; महिला आणि तरुणांचं केलं कौतुक

लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी महिला आणि युवकांचं कौतुक केलं आहे. तसेच यावेळी मतदारांनी एनडीएला निवडलं, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

Delhi Lok Sabha Exit poll : दिल्लीमध्ये ७ जागा भाजप जिंकेल, एक्झिट पोलचा अंदाज

दिल्लीमध्ये लोकसभेचे ७ मतदारसंघ आहेत. या ७ मतदारसंघात भाजप आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. टीव्ही ९ पोलस्टॅटच्या एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. दिल्लीच्या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे आप आणि इंडिया आघाडीला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे.

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर, एक्झिट पोलचा अंदाज

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड आघाडीवर आहे, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर या मतदारसंघातून उज्ज्वल निकम हे पिझाडीवर आहेत. असा अंदाज एक्झिट पोलमधून समोर आला आहे.

Chandrakant Khaire : संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर, अमरावतीत नवनीत राणा आघाडीवर; एक्झिट पोलचा अंदाज

संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत. त्यामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसताना दिसत आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे संदिपान भुमरे पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. तर इम्तियाज जलील देखील पिछाडीवर असल्याची माहिती एक्झिट पोलमधून समोर आली आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे पिछाडीवर आहेत.

North west mumbai lok sabha : वायकरांचं टेन्शन वाढलं; अमोल कीर्तिकरांच्या विजयाची दाट शक्यता, एक्झिट पोलचा अंदाज

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा एक्झिच पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांच्या विजयाची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचं टेन्शन वाढलं आहे.

Maharashtra Lok Sabha Exit poll :  महायुतीचा ४५ पारचा नारा हुकणार? मविआला २०-२३ जागा मिळणार

महाराष्ट्रात महायुतीचा ४५ पारचा नारा हुकण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला २०-२३ जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी सी व्होटरने हा अंदाज व्यक्त केला आहे.

एनडीएला ३७१ जागा तर इंडिया आघाडीला १२५ जागा मिळणार

लोकसभा निवडणुकीचा निकाला अवघ्या काही तासांवर आला आहे. त्याआधी एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजून लागणार याची उत्सुकता देशाला लागली होती. एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून देशात ३७१ जागा एनडीएला मिळणार असल्याचा अंदाज जन की बातच्या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. तर इंडिया आघाडीला १२५ मिळतील असं म्हटलंय.

Kolhapur Lok Sabha Exit Poll : कोल्हापूरची जागा शाहू महाराज जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

महाविकास आघाडीसाठी महत्त्वाच्या कोल्हापूरच्या जागेवर  शाहू महाराज जिंकणार असल्याचं समोर येत आहे. टीव्ही ९ पोलस्टारने हा अंदाज व्यक्त केला आहे.

Exit Poll 2024 : एनडीएला ३९५ जागा तर इंडिया आघाडीला १५४ जागा मिळणार

लोकसभा निवडणुकीचा निकाला अवघ्या काही तासांवर आला आहे. त्याआधी एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजून लागणार याची उत्सुकता देशाला लागली होती. एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून देशात ३९५ जागा एनडीएला मिळणार असल्याचा अंदाज रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. तर इंडिया आघाडीला १५४ मिळतील असं म्हटलंय.

कर्नाटकमध्ये एनडीएला २३ तर इंडिया आघाडीला ४ जागा मिळतील

लोकसभा निवडणुकीचा निकाला अवघ्या काही तासांवर आला आहे. त्याआधी एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजून लागणार याची उत्सुकता देशाला लागली होती. एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून या कर्नाटकमध्ये २३ जागा एनडीएला मिळताना दिसतायेत तर इंडिया आघाडीला २ जागांवर समाधान मानावं लागताना दिसतंय. एबीपी सी व्होटरने हा अंदाज व्यक्त केला आहे.

आंध्र प्रदेशमध्ये एनडीएला २२ जागा मिळताना दिसतायेत

लोकसभा निवडणुकीचा निकाला अवघ्या काही तासांवर आला आहे. त्याआधी एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजून लागणार याची उत्सुकता देशाला लागली होती. एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून या आंध्र प्रदेशमध्ये एनडीएला २२ जागा मिळताना दिसतायेत तर इंडिया आघाडीला खातंही खोलता येणार नसल्याच दिसत आहे. एबीपी सी व्होटरने हा अंदाज व्यक्त केला आहे.

बीडमध्ये पंकजा मुंडे जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

एक्झिट पोलच्या अंदाजात बीडमध्ये पंकजा मुंडे निवडून येताना दिसत आहेत. तर बजरंग सोनवणे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. टीव्ही ९ पोलस्ट्रारने हा अंदाज व्यक्त केला आहे.

केरळमध्ये इंडिया आघाडी १८  एनडीएला २ जागा मिळण्याचा अंदाज

लोकसभा निवडणुकीचा निकाला अवघ्या काही तासांवर आला आहे. त्याआधी एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजून लागणार याची उत्सुकता देशाला लागली होती. एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून या केरळमध्ये इंडिया आघाडी १८  एनडीएला २ जागा मिळताना दिसत आहेत. एबीपी सी व्होटरने हा अंदाज व्यक्त केला आहे.

तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३७ तर एनडीएला २ जागा, पहिला एक्झिट पोलचा अंदाज

लोकसभा निवडणुकीचा निकाला अवघ्या काही तासांवर आला आहे. त्याआधी एक्झिट पोलचा कौल कोणाच्या बाजून लागणार याची उत्सुकता देशाला लागली होती. एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून या तामिळनाडूत इंडिया आघाडीला ३७ तर एनडीएला २ जागा मिळताना दिसतायेत. न्यूज १८ मेगा पोलने हा अंदाज व्यक्त केला आहे.

J. P. Nadda : भाजपला ३७० जागा मिळतील: जे.पी. नड्डा यांचा दावा

काही वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे अंदाज एक्झिट पोलमधून मांडण्यात येणार आहेत. त्या आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी भाजपला ३७० जागा मिळतील असा दावा केला आहे.

अल्पसंख्याक समाज उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहिल्याचं दिसून आलं : श्रीराम पवार यांचं मत

महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे. जात हा प्रश्न कोणत्याच पक्षाला सोडता येत नाही. समोरच्या पक्षातून मत काढून घ्यायचं असेल तर भाजप 'माधव'चा फॉर्म्युला वापरायचे. आता निकालाचं विश्लेषण करतोय, आता एक घटक, एका समाजावर राजकारण करता येणार नाही. यावेळी अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहिल्याचे दिसून आलं, असंं विश्लेषण श्रीराम पवार यांनी केलं.

देशाचा मूड काय? एक्झिट पोलचं महाकव्हरेज पाहा 'साम टीव्ही'वर

मोदी की गांधी? देशाचा मूड नेमका काय? महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळणार? सहानुभुतीच्या लाटेचा ठाकरेंना फायदा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी साम टीव्हीवर पाहा एक्झिट पोलचे अंदाज.

लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपची यंदा निवडणुकीत चांगली कामगिरी राहील, असं भाकीत केलं आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा मिळतील, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

India Alliance NEWS : एका दिवसांत काँग्रेसची भूमिका बदलली; एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार

काँग्रेसने २४ तासाच्या आत भूमिका बदलली आहे. आज विविध वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या एक्झिट पोल चर्चेत काँग्रेस सहभागी होणार आहे. INDIA आघाडीच्या बैठकीत चर्चेत सहभागी होण्याचा निर्णय झाला.

lok Sabha Election : मागील निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या?

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या. जेडीयूने १६ जागा जिंकल्या होत्या. बसपाने १० जागा जिंकल्या होत्या. यंदा काँग्रेसने एक्झिट पोलसंबंधी वृत्त वाहिन्यांच्या डिबेटमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

Lok Sabha Election : लोकसभेच्या मतदानादरम्यान इंडिया आघाडीच्या नेत्यांची नवी दिल्लीत बैठक

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज राजधानी नवी दिल्लीत बैठक सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यासह इतर पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. ४ जूनला होणाऱ्या मतमोजणी दिवशी काय खबरदारी घ्यावी, यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

Lok Sabha exit poll : एनडीए की इंडिया आघाडी? देशातील जनतेचा मूड काय?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचं मतदान १९ एप्रिलला झालं. तर शेवटच्या टप्प्याचं मतदान १ जून रोजी पार पडत आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, आज शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलमधून देशातील लोकांचा मूड माहीत होणार आहे. विविध वृत्तसंस्थाकडून एक्झिट पोल जाहीर होण्यास अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष एक्झिट पोलकडे लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com