Election Commission Press Conference  Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha 2024: यंदा ६४ कोटी नागरिकांनी मतदान केलं; मतमोजणीची तयारी पूर्ण, निकालापूर्वी निवडणूक आयोगाने नेमकं काय सांगितलं?

Election Commission Press Conference Vote Counting: लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आज मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावर्षी ६४ कोटी लोकांनी मतदान केल्याचं सांगितलं आहे. तसंच यावर्षी ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राजीव कुमार म्हणाले की, आतापर्यंत आम्ही १०० प्रेस नोट काढल्या. ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदान केलं आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (Election Commission Press Conference) पार पडली आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं देखील राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.

महिलांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून चुकीचा शब्द निघायला नको, अशी आमची भूमिका होती. आम्ही त्यासाठी कडक सूचना केल्या होत्या, असं राजीव कुमार यांनी सांगितलं होतं. निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी १३५ ट्रेनचं नियोजन केलं (Lok Sabha Election 2024) होतं. १६९२ कर्मचारी हेलिकॉप्टरने पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशातील असा कुठलाही कोपरा नाही की, तिथे निवडणूक कर्मचारी पोहोचले नाहीत, असं राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी सांगितलं आहे.

मतमोजणी दरम्यान काय काय काळजी घ्यायची आहे, त्याची प्रोसेस ठरल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहेत. १०.३० लाख बूथ आहेत. प्रत्येक हॉलमध्ये ४ टेबल आहेत. प्रत्येक पक्षाचा पोलिंग प्रतिनिधी असेल. ही सगळी प्रोसेस ७० ते ८० लोकांमध्ये होत आहे. सिस्टिममधे कुठलीही चूक होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी CCTV लावल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरमधे ५८.५८ टक्के मतदान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी लवकरच मतदान घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मणिपूरमध्ये ९४ स्पेशल पोलिंग बूथ बनवले होते, ही आपल्यासाठी सक्सेस स्टोरी असल्याचं देखील राजीव कुमार म्हणाले (Lok Sabha Election 2024 Result) आहेत. दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर कुठलाही हिंसाचार न होता निवडणुका झाल्या आहेत. यावेळी एकही मोठी घटना समोर आली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

मराठमोळ्या अधिकाऱ्याचं 'पुढचं पाऊल'! IRTS अधिकारी सुशील गायकवाड महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तपदी, पदभार स्वीकारला

Ladki Bahin Yojana : 410 कोटींचा निधी मंजूर, 'लाडकी'ची दिवाळी गोड होणार? सप्टेंबरचा हप्ता मिळणार

Actor Death: चित्रपटसृष्टीवर शोककळा; सलमानसोबत काम केलेल्या प्रसिद्ध बॉडी-बिल्डर अभिनेत्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT