Pune Lok Sabha 2024 : 'खबर पक्की विजय नक्की', निकालाआधीच पुण्यात झळकले रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर्स

Pune Lok Sabha Election Result Prediction : पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद धंगेकर यांचाच विजय होईल, अशा आशयाचे बॅनर्स शहरात लागले आहेत.
'खबर पक्की विजय नक्की', निकालाआधीच पुण्यात झळकले रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर्स
Pune Lok Sabha Election Result PredictionSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती? कुणाला जास्त जागा मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून आहे. त्यातच निकालाआधीच काही ठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत.

'खबर पक्की विजय नक्की', निकालाआधीच पुण्यात झळकले रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर्स
Maharashtra Politics : एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास

पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचाच विजय होणार, अशा आशयाचे बॅनर्स रविवारी शहरात झळकले होते. भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्सची जोरदार चर्चा रंगली होती. अशातच आज सोमवारी शहरात रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत.

शहरातील पर्वतीनगर भागात हे बॅनर्स लागले आहेत. "लोकांवर नाही, तर लोकांच्या मनात राज्य करणारे रविंद्र धंगेकर साहेब खबर पक्की विजय नक्की", अशा आशयाचा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. सध्या या बॅनर्सची शहरात जोरदार चर्चा होत आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी काय?

यंदा पुणे लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत झाली असली, तरी मुख्य लढत रविंद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातच झाली. नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलमध्ये पुण्याची बाजी हे मुरलीधर मोहोळ मारतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. निकालाआधीच कार्यकर्ते शहरभर बॅनर लावत आहेत. दुसरीकडे पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हेच खासदार होतील. एक्झिट पोलचे अंदाज चुकतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.

'खबर पक्की विजय नक्की', निकालाआधीच पुण्यात झळकले रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर्स
Nashik News: विखे पाटलांची एन्ट्री, शुभांगी पाटीलही बंडखोरीच्या तयारीत; नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगणार चढाओढ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com