Mumbai North Constituency: मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल कमळ फुलवणार की, जनतेने पंज्याला दिला कौल?

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Update: Piyush Goyal or Bhushan Patil From Mumbai North Constituency: मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने येथून भूषण पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यातच येथून कोण जिंकू शकतो, हे जाणून घेऊ...
Mumbai North Lok Sabha Constituency: मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल कमळ फुलवणार की, जनतेने पंज्याला दिला कौल?
Piyush Goyal Vs Bhushan Patil From Mumbai North Lok Sabha Constituency Saam Tv

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथून याआधी सलग दोन वेळा म्हणजेच २०२४ आणि २०१९ मधून भाजपचे गोपाळ शेट्टी निवडून आले आहेत. यंदा मात्र पक्षाने त्यांचं तिकीट कापून येथून पियुष गोयल यांना मैदानात उतरवलं आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

पियुष गोयल हे भाजपचे दिग्गज नेते असण्यासोबतच १० वर्षांपासून केंद्रीय मंत्री देखील आहेत. म्हणून त्यांचा येथून विजय होईल, असा विश्वास भाजप कार्यकर्तांना आहे. तसेच येथूल सलग दोन वेळा भाजप खासदार निवडून येत असल्याने लोकसभेत पोहोचण्यास त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वासही भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Mumbai North Lok Sabha Constituency: मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल कमळ फुलवणार की, जनतेने पंज्याला दिला कौल?
Mumbai South Lok Sabha Constituency: अरविंद सावंत हॅट्रिक मारणार की, यामिनी जाधव दिल्ली गाठणार? दक्षिण मुंबईकरांनी कोणाच्या बाजूने दिला कौल?

मात्र ही निवडणूक दिसते तितकी सोप्पी नाही. आतापर्यंत शिवसेना - भाजप येथून युतीत निवडून लढवत होते. याचा मोठा फायदा भाजपला झाला. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. पक्षफुटीनंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाल्याने त्यांचा मतदारही विभागाला गेला आहे. यातच ठाकरे गट आणि काँग्रेची युती असल्याने येथे भूषण पाटील यांना फायदा होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

अशातच लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५७.०२ टक्के मतदान झालं असून याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार.

Mumbai North Lok Sabha Constituency: मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल कमळ फुलवणार की, जनतेने पंज्याला दिला कौल?
Mumbai North Central Lok Sabha: एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम, मतदारराजाने कोणाच्या बाजूने निर्णय सुनावला?

मुंबई उत्तर मध्य लोकसभेचा भूगोल

मुंबई दक्षिण लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड पश्चिम या जागांचा समावेश आहे.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी हे २०१४ आणि २०१९ असे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. तर त्याच्या आधी येथून २००९ मध्ये संजय निरुपम हे काँग्रेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१४ मध्ये गोपाळ शेट्टी यांनी ६ ,६४,००४ मते मिळून संजय निरुपम यांचा पराभव केला होता. निरुपम यांना २,१७ ,४२२ मते मिळाली होती. तर २०१९ मध्येही ७०६,६७८ मते मिळवत शेट्टी विजयी झाले होते. तर यावेळी त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा २,४१,४३१ मते मिळूनही पराभव झाला. दरम्यान, यावेळी येथून कोण बाजी मारणार हे ४ तारखेला निकाल जाहीर झाल्यावर समजणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com