Mumbai South Lok Sabha Constituency: अरविंद सावंत हॅट्रिक मारणार की, यामिनी जाधव दिल्ली गाठणार? दक्षिण मुंबईकरांनी कोणाच्या बाजूने दिला कौल?

Arvind Sawant Vs Yamini Jadhav | Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा ठाकरे गटाच्या वतीने मैदानात आहेत. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Arvind Sawant Vs Yamini Jadhav: अरविंद सावंत हॅट्रिक मारणार की, यामिनी जाधव दिल्ली गाठणार? दक्षिण मुंबईकरांनी कोणाच्या बाजूने दिला कौल?
Arvind Sawant Vs Yamini Jadhav Lok Sabha Election BattleSaam TV
Published On

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहेत झाले असून येथे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत आहे. यातच या मतदारसांघात सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा ठाकरे गटाच्या वतीने मैदानात आहेत. शिंदे गटाने आमदार यामिनी जाधव यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

शिवसेना आणि भाजप युतीची या मतदारांघात भाजपची मोठी ताकद आहे. मात्र पक्षफुटीमुळे शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५०.०६ टक्के मतदान झालं असून याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार.

मुंबई उत्तर मध्य लोकसभेचा भूगोल

मुंबई दक्षिण लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या जागांचा समावेश आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

या लोकसभा मतदारसंघात सलग दोन वेळा म्हणजेच २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेच्या तिकिटावर मिलिंद देवरा यांनी विजय मिळवला. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना संधी देण्यात आली. या निवडणुकीत अरविंद सांवत यांना ३७४,६०९ मते मिळाली आणि ते विजयी झाले तर देवरा यांना २,४६,०४५ मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये ही सांवत यांनी ४२१,९३७ मते मिळवत विजयाची नोंद केली. तर देवरा यांना पुन्हा ३,२१,८७० मते मिळून पराभव स्वीकारावा लागला.

Arvind Sawant Vs Yamini Jadhav: अरविंद सावंत हॅट्रिक मारणार की, यामिनी जाधव दिल्ली गाठणार? दक्षिण मुंबईकरांनी कोणाच्या बाजूने दिला कौल?
Mumbai North Central Lok Sabha: एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन? वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम, मतदारराजाने कोणाच्या बाजूने निर्णय सुनावला?
Arvind Sawant Vs Yamini Jadhav: अरविंद सावंत हॅट्रिक मारणार की, यामिनी जाधव दिल्ली गाठणार? दक्षिण मुंबईकरांनी कोणाच्या बाजूने दिला कौल?
Mumbai North West Lok Sabha: ठाकरे गड राखणार की शिंदे बाजी मारणार? उत्तर पश्चिम मुंबईत कोण होणार विजयी?

२०२४ मध्ये काय आहे चित्र?

दरम्यान, आतापर्यंत अरविंद सावंत संयुक्त शिवसेनेचे उमदेवार म्हणून निवडून लढवून जिंकून आले होते. मात्र पक्षफुटीनंतर त्यांना यामिनी जाधव यांच्याकडून चांगली टक्कर मिळू शकते. याचे कारण म्हणजे येथून २००४ आणि २००९ मध्ये खासदार राहिलेले मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून शिंदेंना साथ दिली आहे. यामुळे त्यांची मतेही यामिनी जाधव यांना शिफ्ट होऊ शकतात. मात्र यंदा इंडिया आघाडीत असलेल्या काँग्रेसचा येथील मतदार सांवत यांच्या बाजूने कौल देऊ शकतो. म्हणून येथून कोण बाजू मारणार हे ४ जुनलाच समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com