atul bhosale reaction on udayanraje bhosale win criticises prithviraj chavan Saam Digital
लोकसभा २०२४

पृथ्वीराज चव्हाणांचा बालेकिल्ला ढासळला, उदयनराजेंच्या विजयाचा अतुल भोसलेंनी मताधिक्यातून दिलं दणदणीत उत्तर

udayanraje bhosale wins satara lok sabha constituency: सातारा लाेकसभा मतदारसंघात शरद पवार गटाला भाजपने धक्का दिला आहे. या मतदारसंघात उदयनराजे भाेसले यांनी विजय मिळविला आहे.

संभाजी थोरात

उदयनराजे भाेसले यांच्या विजयात भाजपने काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघात मुंसडी मारली आहे. सन 2019 च्या निवडणुकीत कराड दक्षिणमधून राष्ट्रवादी कॉग्रेसला 32 हजार मतांची आघाडी होती. त्याचं ठिकाणी आता भाजपाने 616 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी आत्मचिंतन करावे, असा टोला सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी आमदार चव्हाणांना लगावला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले यांचा सुमारे 25 हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. केवळ अधिकृत घाेषणा अद्याप बाकी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदेना उत्तम मते मिळतील. उदयनराजेंचा दीड लाखांनी पराभव हाेईल असा विश्वास आमदार पृथ्वीराच चव्हाण यांनी म्हटले हाेते.

त्यावर डाॅ. अतुल भाेसले म्हणाले भाजपचे उमेदवार उदयनराजेंना कराड दक्षिणमधून 616 मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे कराड दक्षिणच्या मतदारांनी कमळ चिन्हाला भरघाेस मतदान केले आहे. त्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आत्मचिंतन करावे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT