कसं... बाबाराजे म्हणतील तसं... शड्डू ठाेकत उदयनराजेंनी झळकावला शिवेंद्रसिंहराजेंचा बॅनर, Video

udayanraje bhosale along with shivendrasinhraje poster video viral: सातारा शहरात उदयनराजे भाेसले यांनी विजयाकडे वाटचाल सुरु ठेवल्याने कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणुक काढली.
udayanraje bhosale along with shivendrasinhraje poster video viral satara lok sabha election result 2024
udayanraje bhosale along with shivendrasinhraje poster video viral satara lok sabha election result 2024Saam Digital

सातारा लाेकसभा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांच्या पेक्षा अधिक मताधिक्य मिळविल्यानंतर खासदार उदयनराजे भाेसले यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येत गुलालाची उधळण केली. फटाके फाेडत समर्थकांनी उदयनराजेंची राजपथावर मिरवणुक काढली. त्यावेळी खासदार उदयनराजेंनी या मिरवणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे बॅनर झळकवले. त्यावर कसं बाबाराजे म्हणतील तसं असे लिहिले हाेते.

उदयनराजे भाेसले यांनी मतमाेजणीच्या अखेरच्या काही फे-यांमध्ये 10 हजार 172 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत त्यांनी विजयाकडे कूच केल्याची चर्चा आहे. दरम्यान उदयनराजेंच्या समर्थकांनी साता-याच्या रस्त्यावर उतरुन फटाके फाेडले. पेठा पेठांमधील युवा वर्ग राजपथावर दाखल झाले.

udayanraje bhosale along with shivendrasinhraje poster video viral satara lok sabha election result 2024
छत्रपती घराण्यावरील प्रेम जनतेने दाखवून दिले, माेठं मताधिक्यानंतर राजेंची पहिली प्रतिक्रिया (पाहा व्हिडिओ)

एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज, आता कसं बाबाराजे बाबाराजे सांगतिल तसं अशाही घाेषणा देत कार्यकर्ते उदयनराजेंच्या विजयाच्या घाेषणा देऊ लागले. या मिरवणुकीत उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र असलेले बॅनर झळविले. हळूहळू ही मिरवणुक शहरातून पुढे सरकत हाेती.

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale along with shivendrasinhraje poster video viral satara lok sabha election result 2024
Satara Constituency: उदयनराजे, शिवेंद्रराजेंचे आव्हान कसं पेलणार? शशिकांत शिंदेंनी हसत हसतच सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com