साता-यात यशवंत विचारांचा उमेदवारच नव्हता, शरद पवारांचा उमेदवार चुकला; महेश शिंदेचा शशिकांत शिंदेंवर राेख

mla mahesh shinde reaction on shashikant shinde : सातारा लाेकसभा मतदारसंघात उदयनराजे भाेसले यांच्या प्रचाराची भिस्त आमदार महेश शिंदे यांच्यावर देखील हाेती. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून उदयनराजेंना मताधिक्य दिले.
mla mahesh shinde reaction on udayanraje bhosale lead in satara lok sabha election result 2024
mla mahesh shinde reaction on udayanraje bhosale lead in satara lok sabha election result 2024Saam Tv

सातारा लाेकसभा मतदारसंघात ज्येष्ठ शरद पवार यांची उमेदवारी चुकली. या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार नव्हता. चार हजार काेटींचा घाेटाळा केला हाेता. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे अशी प्रतिक्रिया काेरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांनी घेतलेल्या निर्णायक मतांच्या आघाडीनंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याबाबत बाेलताना व्यक्त केली. (lok sabha nivadnuk nikal)

आमदार महेश शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी जनता ठाम उभी राहिली. येथील जनता भूलथापांना बळी पडली नाही. काेरेगाव मतदारसंघात पाण्याच्या याेजना आणल्याचे जनतेने पाहिले आहे.

mla mahesh shinde reaction on udayanraje bhosale lead in satara lok sabha election result 2024
छत्रपती घराण्यावरील प्रेम जनतेने दाखवून दिले, माेठं मताधिक्यानंतर राजेंची पहिली प्रतिक्रिया (पाहा व्हिडिओ)

उधळलेला गुलालानंतर उदयनराजे भाेसलेंचा विजयश्री खेचून आणला यावर बाेलताना महेश शिंदे म्हणाले ही त्यांची (शशिकांत शिंदे) हॅट्रीक आहे. गुलालानंतर त्यांना बुक्का मिळताे. माणसाचे मन स्वच्छ असावे लागते. ताेंडात एक आणि पाेटात एक तेव्हा भगवंत तुम्हांला शिक्षा देता असेही महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेवर टीका करताना म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

mla mahesh shinde reaction on udayanraje bhosale lead in satara lok sabha election result 2024
कसं... बाबाराजे म्हणतील तसं... शड्डू ठाेकत उदयनराजेंनी झळकावला शिवेंद्रसिंहराजेंचा बॅनर, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com