लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडल्यानंतर आज मंगळवारी तिसऱ्या टप्यासाठी मतदान होत आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात मतदान होत आहे.
सकाळी ७ वाजेपासून मतदानासाठी सुरूवात झाली असून अगदी सामान्यांपासून, अनेक राजकीय मंडळी आणि सेलिब्रिटी मतदानासाठी सकाळी घराबाहेर पडलेले आहेत. अशातच लातूरमध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया देशमुखने मतदानाचा हक्क बजावला आहे.
हक्क बजावल्यानंतर रितेशने आणि जेनिलियाने माध्यमांसोबत संवाद साधला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रितेश देशमुखने एएनआय ह्या वृत्तसंस्थेसोबत संवाद साधलेला आहे. "आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे. मी फक्त आजच्या दिवसासाठी मुंबईवरून लातूरमध्ये आलो आहे. प्रचंड ऊन आहे, व्यवस्थित काळजी घेऊन मतदान करावे. एक दिवस देशासाठी ऊन्हाचा त्रास सहन करायला काही हरकत नाही. देशासाठी तो गरजेचा आहे." अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुखने दिली आहे.
तर जेनिलिया देशमुखनेही मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. "आज मतदानाचा दिवस आहे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करणं खूप गरजेचं आहे." अशी प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेत्री जेनिलिया देशमुखने दिली आहे. यावेळी रितेश आणि जेनिलियासोबत इतर देशमुख कुटुंबीयांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी लातूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.