Baramati lok Sabha : शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; १० वर्षांनी मुंबई ऐवजी बारामतीत केलं मतदान, Video

Baramati lok Sabha Voting in baramati : आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शरद पवारांनी मतदान केलं. शरद पवारांनी रांग लावून मतदानचा हक्क बजावला.
sharad pawar casting vote
sharad pawar casting voteSaam tv

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसरऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघासहित ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याचदरम्यान, राज्यातील बारामती हायव्होल्टेज लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शरद पवारांनी मतदान केलं. शरद पवारांनी रांग लावून मतदानचा हक्क बजावला.

राज्याचं नव्हे तर लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयीचा सामना होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. शेकडो लोक घराबाहेर पडून मतदान केंद्रावर पोहोचत आहेत.

sharad pawar casting vote
Mumbai Sanjay Raut | राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं

शरद पवार देखील आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घरातून निघाले. त्यानंतर माळेगाव येथील मतदान केंद्रावर पोहोचले. त्यानंतर मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदानसाठी शरद पवार स्वतः रांगेत थांबले. यावेळी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळालं. यंदा शरद पवार यांनी मतदान मुंबई ऐवजी बारामतीमध्ये केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी रांगेतील नागरिकांशी संवाद साधला.

sharad pawar casting vote
Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पंतप्रधान मोदींनीही केलं मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिसऱ्या टप्प्यात मतदान केलं. पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात मतदान केलं. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अमिश शहा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी मोदींनी मतदान केल्यानंतर इतरांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com