Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Lok Sabha election 2024: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ११ जागांवर आज मतदान होणार आहे. यामध्ये बारामती, माढा, रायगडसह ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam TV
Published On

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडल्यानंतर आज मंगळवारी तिसऱ्या टप्यासाठी मतदान होत आहे. देशातील १० राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशाचा समावेश आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ११ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, लातूर, बारामती, माढा, हातकणंगले, रायगड, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली आणि सातारा या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बारामती, कोल्हापूर, सांगलीकडे सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे. कारण, मागील काही दिवसांपासून हे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक, अशी थेट लढत होणार आहे.

हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विरुद्ध महायुतीचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. सांगलीत महायुतीचे संजय काका पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात लढत होत आहे.

याशिवाय रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत, साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते, माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविरुद्ध भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, अशी लढत पाहायला मिळेल.

दुसरीकडे, रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे अनंत गिते यांच्या निवडणुकीचा सामना रंगणार आहे. लातूरमध्ये अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याठिकाणी काँग्रेसचे शिवाजीराव कलगे यांच्याविरुद्ध भाजपाचे सुधाकर श्रृंगारे लढत होत आहे. धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, यांच्यात लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com