Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

BJP News: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे.
तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?
Lok Sabha Election 2024Saam Tv

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एकूण 283 जागांवर मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पाच राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. 93 जागांपैकी 10 अनुसूचित जाती आणि 11 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमधील जागांवर मतदान होणार आहे. मागच्या निवडणुकीत याच टप्प्यात भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. मात्र यंदा काय आहे राजकीय परिस्थिती? हेच आपण जाणून घेणार आहोत.

तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?
Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीएने अनुक्रमे 8 आणि 75 जागा जिंकल्या होत्या. यात 93 जागांपैकी 71 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर काँग्रेस फक्त 4 जागांवर मर्यादित राहिली होती. 2014 मध्ये एनडीएने यापैकी 68 जागा जिंकल्या होत्या आणि इंडिया आघाडी पक्षांनी 15 जागा जिंकल्या होत्या, तर 11 जागा इतर पक्षांना गेल्या होत्या.

1332 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मंगळवारी एकूण 1,332 उमेदवार रिंगणात असतील. या टप्प्यात भाजपने सर्वाधिक 82 उमेदवार उभे केले आहेत. त्यापाठोपाठ बसपाने 79 आणि काँग्रेसने 68 उमेदवार उभे केले आहेत. गुजरातमध्ये 25 जागांवर मतदान होत आहे. या राज्यात सर्वाधिक 266 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यातच महाराष्ट्रात 11 जागांवर 258 उमेदवार आणि कर्नाटकात 14 जागांवर 227 उमेदवार रिंगणात आहेत.

तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 11 जागांवर निवडणूक होणार आहे. रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागा आहेत. यापैकी लातूर आणि सोलापूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत आहे. सातारा, माढा येथे भाजप आणि शरद पवार यांच्यात तर धाराशिव, सांगली, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात बारामती, कोल्हापूर आणि रायगडमध्ये लढत होणार आहे.

दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाची परिस्थिती भाजपसाठी खूप बदलली आहे. मागच्यावेळी संयुक्त शिवसेना भाजपसोबत असल्याने राज्यात भाजपला चांगलं यश मिळालं होतं. मात्र शिवसेनेत फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले आहेत. याचा परिणाम मदानावरही दिसून येऊ शकतो, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com