Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Eknath Shinde News: राज ठाकरे यांचं नाव सुचवलं म्हणून आनंद दिघे यांना मानसिक त्रास दिला. दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
Eknath Shinde on Uddhav Thackeray
Eknath Shinde on Uddhav Thackeray Saam Tv

Eknath Shinde on Uddhav Thackeray:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांचं नाव सुचवलं म्हणून आनंद दिघे यांना मानसिक त्रास दिला. दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. आज ठाण्यात शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे गंभीर सुरू केले आहेत.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांची मालमत्ता कुठे कुठे आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला होता, हा दावा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Eknath Shinde on Uddhav Thackeray
Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

ठाणे येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की, ''उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पडत होते. त्यांना राजीनामा द्या म्हणून सांगत होते. इतक्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांचं पद काढून घेतलं, तर त्याच्या जीवाला काय वाटेल. तो तर आत्महत्याच करेल.''

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ''आनंद दिघे यांच्या निधनानंतर जेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला काय प्रश्न विचारायला हवं होतं? कसा आहे, त्यांच्या मागे आता कोण आहे, असं त्यांनी मला विचारायला हवं होतं. मात्र त्यांनी मला मला विचारलं आनंद दिघे यांची मालमत्ता कुठे-कुठे आहे.''

Eknath Shinde on Uddhav Thackeray
Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याने अद्याप यावर भाष्य केलेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com