Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Shantigiri Maharaj: महायुतीच्या जागावाटपात नाशिकचा महातिढा सुटता सुटत नव्हता. अखेर शिंदेंची शिवसेना ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली आणि मोठ्या संघर्षानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली.
Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?
Shantigiri MaharajSaam Tv
Published On

Lok Sabha Election 2024:

>> गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई

महायुतीच्या जागावाटपात नाशिकचा महातिढा सुटता सुटत नव्हता. अखेर शिंदेंची शिवसेना ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली आणि मोठ्या संघर्षानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली. मात्र गोडसेंच्या विजयात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव या भागात आहे. त्यामुळे इथल्या महायुतीच्या जागांना फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल या आशेनं त्यांनी अर्ज भरताना पक्षाच्या कॉलममध्ये शिवसेनेचा उल्लेख केला. मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकत थेट आव्हान दिलंय. शांतिगिरी ठाम असल्यामुळे महायुतीच्या गोडसेंना घाम फुटलाय.

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते. पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महाराजांची मनघरणी करण्यात आली. मात्र त्यांना यश आलं नाही.

कोण आहेत शांतिगिरी महाराज?

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत. 2004ला इलाहाबादमधील कुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदवी मिळाली. 2009मध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 1 लाख 42 हजार मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतिगिरी महाराजांचं व्यसनमुक्ती, शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे. राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार सक्रीय आहे.

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?
Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

दरम्यान, नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे, मविआचे राजाभाऊ वाजे आणि शांतीगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. नाशिकला 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार होण्यासाठी महाराज प्रयत्नशील आहेत. त्यांचे शहरभर लागलेले होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरतायत.

'जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं' असा मजकूर त्यावर आहे. या होर्डिंगच्या माध्यमातून सूचक इशारा महायुतीला देण्यात आला आहे. धार्मिक नगरी असलेल्या नाशिकचा खासदारही आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेचा असावा यासाठी स्वामी, महंत आग्रही आहेत. मात्र नाशिककर मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com