Lok Sabha Election : आधी मतदान मग लग्न; अतिदुर्गम भागात लग्नापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

gondia News : लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणून मतदानाला मानलं जातं. उन्हाच्या पारा जास्त असल्याने कित्येक लोक मतदान करायला जात नाही. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता प्रशासनाने सुद्धा विविध उपक्रम राबविले आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam tv
Published On

शुभम देशमुख 
गोंदिया
: मतदानाचा हक्क बजाविण्यात अनेक मतदार मागे राहतात. तर काहीजण मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय काही केल्या सोडत नाही. अशाच प्रकारे (Gondia) गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील केशोरी या गावात (Marriage) विवाह असताना नवरदेवाने आपल्या मतदानाचा हक्क सोडला नाही. लग्न मंडपात पोहचण्यापूर्वी नवरदेव असलेल्या गणेश धनीराम कुंभरे मतदान केंद्र गाठून मतदान केले. अर्थात आधी मतदान मगच लग्न असाच प्रत्यय यानिमित्ताने आला. (Maharashtra News)

Lok Sabha Election
Amravati Lok Sabha : शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथनामा; महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंचा शपथनामा चर्चेत

लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणून मतदानाला मानलं जातं. उन्हाच्या पारा जास्त असल्याने कित्येक लोक (Lok Sabha Election) मतदान करायला जात नाही. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता प्रशासनाने सुद्धा विविध उपक्रम राबविले आहे. तरी देखील अनेकजण मतदान हक्क बजावत नाही. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नक्षलदृष्ट्या संवेदनशील भाग असलेल्या केशोरी येथे मतदानाच्या कालावधी कमी असतो. सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत मतदान (election) केले जाते. अशात अति दुर्गम भागात प्रशासनाची नागरिकांना मतदानासंबंधी जागरूकता करता विविध उपक्रम सुद्धा राबविले जाते. मात्र या तरुणाने जे करून दाखवले यावर सर्वांना मतदानाच्या हक्काप्रती जागरूकता निर्माण होईल हे मात्र खरं. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election
Vijaykumar Gavit News : लोकांकडून पैसे घेतले मात्र ते परतच केले नाही; मंत्री विजयकुमार गावित यांचा पाडवींवर गंभीर आरोप

गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नक्षलदृष्ट्या संवेदनशील भाग असलेल्या केशोरी येथील बूथ क्रमांक ३०६ येथे गणेश धनीराम कुंभरे या तरुणाने लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, आधी मतदानाच्या अधिकार नंतर लग्न असे धोरण आखल्याने गणेश याचे गावात कौतुक केले जात आहे. दरम्यान मतदान करायचेच असल्याने लग्न लागण्यापूर्वी मतदान करायला आल्याचे गणेश याने बोलताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com