Amravati Lok Sabha : शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथनामा; महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंचा शपथनामा चर्चेत

Amravati News : निवडणुकीच्या रिंगणात उतरताना प्रत्येक पक्ष किंवा उमेदवार आपला जाहीरनामा जनतेसमोर ठेवून निवडणूक लढवत असतो. या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या कामांना प्राधान्य असेल हे विषय ठेवलेले असतात.
Amravati Lok Sabha
Amravati Lok SabhaSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: लोकसभा निवडणुकीला सामोरे जातांना अमरावती (Amravati) लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी शपथनामा तयार केला आहे. जनतेची कोणकोणती कामे आपण करणार, याचा शपथनामा चक्क शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून जनतेसमोर ठेवला आहे. त्यामुळे हा जाहीरनामा चर्चेचा विषय ठरला आहे. (Tajya Batmya)

Amravati Lok Sabha
Dhule Lok Sabha : काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य अद्याप सुरूच; महाविकास आघाडीच्या बैठकीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्षांची पाठ

निवडणुकीच्या रिंगणात उतरताना प्रत्येक पक्ष किंवा उमेदवार आपला जाहीरनामा जनतेसमोर ठेवून निवडणूक लढवत असतो. या (Lok Sabha Election) जाहीरनाम्यामध्ये कोणत्या कामांना प्राधान्य असेल हे विषय ठेवलेले असतात. असाच जाहीरनामा नव्हे तर शपथनामाच अमरावती मतदार संघातील (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी जनतेसमोर ठेवला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati Lok Sabha
Vijaykumar Gavit News : लोकांकडून पैसे घेतले मात्र ते परतच केले नाही; मंत्री विजयकुमार गावित यांचा पाडवींवर गंभीर आरोप

काय नमूद आहे शपथनाम्यात 

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवून शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी कटिबद्ध राहील, शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते, संत्राफळांच्या प्रक्रिया केंद्राची निमिर्तीसाठी पुढाकार घेऊन ५० हजार लोकांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असेल, जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये ७० टक्के स्थानिकांना रोजगार मिळवून देणार, प्रत्येक तालुक्यात डिजिटल लायब्ररी उभारणार, महिलांना शहरात मोफत बस सेवा तसेच प्रत्येक तालुक्यात फिरते आरोग्य केंद्र उभारण्यात येणार, मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर होणारे अनधिकृत अतिक्रम रोखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळवून देणार असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com