Dhule Lok Sabha : काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य अद्याप सुरूच; महाविकास आघाडीच्या बैठकीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्षांची पाठ

Dhule News : धुळे लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीदरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Dhule Lok Sabha
Dhule Lok SabhaSaam tv

धुळे : धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी (dhule) आज महाविकास आघाडीच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठकीत लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेस (Congress) जिल्ह्याध्यक्ष सोनेरी यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. अर्थात काँग्रेसमध्ये असलेले नाराजीनाट्य अजूनही सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Latest Marathi News)

Dhule Lok Sabha
Chaitra Ekadashi Yatra : पंढरीत दोन लाख भाविक दाखल; विठ्ठल दर्शनासाठी एक किमी लांब रांग

धुळे लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आज (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीदरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) त्याचबरोबर उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासह शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती बघायला मिळाली आहे. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना जिंकून आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Lok Sabha
Parbhani News : बँकेकडून कर्ज भरण्याबाबत नोटीस; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे. मात्र या बैठकीला शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेले धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे बैठकीदरम्यान लावण्यात आलेल्या बॅनरवर महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. परंतु या बॅनरवर देखील शाम सनेर यांचा फोटो डावलण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com