Pandharpur Chaitra Ekadashi Yatra
Pandharpur Chaitra Ekadashi YatraSaam tv

Chaitra Ekadashi Yatra : पंढरीत दोन लाख भाविक दाखल; विठ्ठल दर्शनासाठी एक किमी लांब रांग

Pandharpur News : पंढरपूरमध्ये भाविकांची नेहमीच मांदियाळी असते, यात एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी अधिक असते. दरम्यान पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार यात्रांपैकी चैत्री यात्रा देखील महत्वाची मानली जात असते.

पंढरपूर : प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेल्या चैत्री यात्रेच्या निमित्ताने आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची नित्य महापूजा संपन्न झाली. मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. चैत्री यात्रेच्या निमित्ताने (Pandharpur) पंढरपुरात सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. (Maharashtra News)

Pandharpur Chaitra Ekadashi Yatra
Washim News : कोयाळी बु. येथील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार; आरोग्य उपकेंद्रासाठी एकवटले ग्रामस्थ

पंढरपूरमध्ये भाविकांची नेहमीच मांदियाळी असते, यात एकादशीला (Ekadashi) विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी अधिक असते. दरम्यान पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार यात्रांपैकी चैत्री यात्रा देखील महत्वाची मानली जात असते. या चैत्री यात्रेनिमित्ताने भाविक मोठ्या संख्यने येत असतात. मात्र सध्या असलेल्या कडक उन्हाचा तडाखा आणि देवाचे पदस्पर्श दर्शन बंद असल्याने यंदा गर्दी कमी असल्याचे दिसून येत आहे. तरी देखील २ लाखापर्यंत भाविक पंढरीत आले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur Chaitra Ekadashi Yatra
Maval News : गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा हातोडा; चार लाखाचे रसायन केले उद्ध्वस्त, दोन जण ताब्यात

१ किलोमीटर पर्यंत रांग 

विठुरायाच्या मुख दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर गेली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने पिण्याचे पाणी, आरोग्य आणि फराळाची मोफत सोय केली आहे. चैत्री एकादशीचे पवित्र स्नान करण्यासाठी पहाटे पासूनच भाविकांनी (Chandrabhaga River) चंद्रभागेच्या तीरी मोठी गर्दी केली आहे. विठुनामाच्या जय घोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com