Washim News : कोयाळी बु. येथील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार; आरोग्य उपकेंद्रासाठी एकवटले ग्रामस्थ

Washim News : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कोयाळी बु. येथील चार वर्षापूर्वी स्थलांतराने मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र अद्यापही सुरु झालेले नाही.
Washim News
Washim NewsSaam tv

मनोज जयस्वाल 

वाशिम : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना लोकप्रधिनी व सरकारवर रोष व्यक्त करत अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर (Lok Sabha Election) बहिष्कार टाकल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात आणखी एका गावाची भर पडली असून आरोग्य उपकेंद्रासाठी वाशीम (Washim) जिल्ह्यातील कोयाळी गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Live Marathi News)

Washim News
Sanjay Raut News: नवनीत राणांवरील टीका संजय राऊतांना भोवणार? महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कोयाळी बु. येथील चार वर्षापूर्वी स्थलांतराने मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र अद्यापही सुरु झालेले नाही. याबाबत वाशिम जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी केल्यानंतर देखील आरोग्य विभागाच्या वेळकाढूपणामुळे आरोग्य उपकेंद्र बंद आहे. यामुळे ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. आरोग्याची समस्या आल्यास ग्रामस्थांना खाजगी रुग्णालय किंवा शहरात जावे लागत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Washim News
Marathwada Temperature : मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला; तापमान पोहचले ४२ अंशाच्यावर

पाठपुरावा करून देखील आरोग्य उपकेंद्र सुरु होत नसल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी अकोला लोकसभेच्या मतदानावर (Election) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत उपकेंद्र चालू होणार नाही, आम्ही मतदान करणार नाही; असा एकमताने निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com