Maval News : गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा हातोडा; चार लाखाचे रसायन केले उद्ध्वस्त, दोन जण ताब्यात

Maval News : राज्य उत्पादन शुल्क विभाग तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सराफ यांना अवैध हातभट्टीबाबत माहिती मिळाली होती.
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : मावळच्या औंधे गावाला लागुन असलेल्या कंजार भात वस्ती शेजारी असलेल्या नाल्यात अवैधरित्या गावठी (Maval) हातभट्टी दारू निर्मिती केली जात होती. या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग तळेगावच्या वतीने हातोडा चालवून उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच येथून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. (Tajya Batmya)

Maval News
Marathwada Temperature : मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला; तापमान पोहचले ४२ अंशाच्यावर

राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise department) तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सराफ यांना अवैध हातभट्टीबाबत माहिती मिळाली होती. यात दोन व्यक्ती दुचाकीवर ३५ लिटरची गावठी हातभट्टी (Liquor) दारू विकायला घेऊन जात आहे. यानंत दोन टीम तयार करून त्यांनी आरोपींना गाठले. पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी जिथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार केली जाते तिथे घेऊन गेले. घटनास्थळी जमिनीत पुरलेले गावठी हातभट्टी रसायांचे बॅरल सर्व रसायन उद्ध्वस्त केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maval News
Washim News : कोयाळी बु. येथील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार; आरोग्य उपकेंद्रासाठी एकवटले ग्रामस्थ

दोघांना घेतले ताब्यात 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ३ लाख ८९ हजार १०० रुपये किमतीचा कच्चा दारू बनवण्याचे रसायन उद्ध्वस्त केल. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विपिन भरत राजपूत आणि ईशांत भरत राजपूत अशी दोन आरोपींची नावे आहेत. याचा पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com