Kidney disease saam tv
लाईफस्टाईल

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

High creatinine: क्रिएटिनिनची पातळी वाढणं हे किडनीच्या बिघाडाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. सतत थकवा, लघवीतील बदल, सूज, भूक कमी लागणं आणि श्वास घेण्यास त्रास यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासणी करून किडनीचं आरोग्य जपा.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल किडनीच्या आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. त्यामुळे शरीर वेळोवेळी देत असलेले इशारे ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं. किडनी व्यवस्थित काम करतेय की नाही याचा अंदाज लावण्यासाठी क्रिएटिनिन (Creatinine) ही चाचणी महत्त्वाची मानली जाते. रक्तातील क्रिएटिनिनची पातळी वाढू लागली तर त्याचा अर्थ किडनीवर ताण येत आहे किंवा ती रक्त नीट फिल्टर करू शकत नाही, असा असू शकतो. विशेष म्हणजे इतर गंभीर लक्षणं दिसण्याआधीच हा बदल जाणवू शकतो.

याबाबत मणिपाल हॉस्पिटलमधील नेफ्रॉलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. नितीन कुमार सांगतात की, आपल्या शरीरात स्नायू काम करत असताना 'क्रिएटिन' नावाच्या घटकाचं विघटन होऊन क्रिएटिनिन तयार होतं. निरोगी किडनी हे क्रिएटिनिन रक्तातून गाळून लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकते. मात्र किडनीची कार्यक्षमता कमी झाली की, हे क्रिएटिनिन रक्तात साचू लागतं आणि त्याची पातळी वाढते. त्यामुळे क्रिएटिनिन वाढणं हे किडनीच्या बिघडण्याचं सुरुवातीचं लक्षण मानलं जातं.

किडनीच्या खराब होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सतत थकवा जाणवणं

दिवसभर थकवा जाणवणं किंवा अगदी कमी काम करूनही अशक्त वाटणं हे केवळ धावपळीच्या जीवनशैलीमुळेच असेल असे नाही. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडत नाहीत. त्यामुळे ते रक्तात साचू लागतात आणि शरीराच्या विविध भागांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठाही कमी होऊ शकतो. यामुळे सतत थकवा, अशक्तपणा वाटू लागतो.

शरीरावर सूज येणं

पाय, घोटे, तळपाय किंवा डोळ्यांच्या आसपास सूज दिसू लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. किडनी शरीरातील मीठ आणि पाण्याचे संतुलन राखण्याचं काम करतं. हे काम नीट न झाल्यास शरीरात अतिरिक्त पाणी साचतं आणि सूज येऊ लागते.

भूक कमी लागणं

अनेक रुग्णांना अचानक अन्नाची इच्छा होत नाही, तोंडाला धातूसारखी चव येते किंवा सतत मळमळल्यासारखं वाटतं. किडनी रक्तातील घातक पदार्थ बाहेर टाकू शकत नसल्यामुळे हे पदार्थ शरीरातच राहतात. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि अशी लक्षणं दिसू लागतात.

श्वास घेण्यास त्रास होणं

विश्रांती घेत असतानाही किंवा झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे गंभीर लक्षण असू शकतं. किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरात साचलेलं अतिरिक्त पाणी फुफ्फुसांमध्येही जाऊ शकतं. त्यामुळे श्वास लागणं किंवा दम लागण्याचा त्रास सुरू होतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT