Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Surabhi Jayashree Jagdish

पोटाचा कॅन्सर

पोटाचा कॅन्सर हा पोटाच्या आतील पेशींमध्ये सुरू होतो. सुरुवातीला याची लक्षणं साधी अपचन किंवा पोटदुखी अशी दिसू शकतात, त्यामुळे तो ओळखणं कठीण जातं. Gastric cardia कॅन्सर पोटाच्या वरच्या भागात, अन्ननलिकेजवळ सुरू होतो.

gastric cancer | saam tv

आहार आणि जीवनशैली

डॉक्टरांच्या मते योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास पोटाच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. चार महत्त्वाच्या उपायांनी धोका जवळपास निम्म्यापर्यंत कमी होऊ शकतो. हे उपाय कोणते आहेत ते पाहूयात.

stomach lining health | saam tv

आहारात लसणाचा समावेश

लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचा घटक असतो जो कॅन्सर पेशींची वाढ कमी करण्यास मदत करतो. तो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि बॅक्टेरियाविरुद्ध संरक्षण देतो. नियमित लसूण सेवन केल्यास पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

cancer awareness | saam tv

प्रक्रिया केलेल्या मांस टाळा

सॉसेज, हॅम आणि डेली मीटमध्ये नायट्रेट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्स असतात. हे घटक पोटात जाऊन कॅन्सर निर्माण करणाऱ्या पदार्थांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळे यांचं सेवन कऱणं टाळावं

broccoli benefits | saam tv

H. pylori इन्फेक्शनची तपासणी

H. pylori हा एक सामान्य बॅक्टेरिया असून तो पोटाच्या आतील आवरणात संसर्ग निर्माण करतो. दीर्घकाळ हा संसर्ग राहिल्यास पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. सतत पोटदुखी, फुगणं किंवा मळमळ असल्यास तपासणी करणं आवश्यक आहे.

cabbage health benefits | saam tv

भाज्यांचं सेवन वाढवा

ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी आणि ब्रसेल्स स्प्राऊट्स या क्रुसिफेरस भाज्या शरीरातील डिटॉक्स एन्झाइम्स एक्टिव्ह करतात. या भाज्या कॅन्सर निर्माण करणाऱ्या घटकांना डीएनएशी जोडण्यापासून रोखतात. नियमित सेवन केल्यास पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

gut health | saam tv

कसा कमी कराल धोका?

संतुलित आहार आणि नियमित आरोग्य तपासणीमुळे पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी करता येतो. प्रक्रिया केलेले अन्न टाळणं आणि नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, या सवयींमुळे कॅन्सरचा धोका जवळपास निम्म्याने कमी होऊ शकतो.

immune system boost | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

natural cancer prevention | saam tv
येथे क्लिक करा