High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल

असंतुलित आहार, जास्त तळलेलं आणि फास्ट फूड खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. शारीरिक हालचाली कमी असणे हेही मोठं कारण आहे.

Cholesterol Symptoms | saam tv

हृदय आणि नसांवर होणारा परिणाम

जास्त कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये ब्लॉकेज तयार होऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. मेंदू आणि इतर अवयवांपर्यंत रक्तपुरवठा कमी होऊ शकतो.

Blocked Arteries | saam tv

दीर्घकालीन गुंतागुंत आणि धोका

ही स्थिती वाढल्यास पायांमध्ये गंभीर ब्लॉकेज निर्माण होऊ शकते. काही वेळा गॅंग्रीनसारखी गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते. वेळेत उपचार न घेतल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

Leg Pain | saam tv

चालताना पायात दुखणं

चालताना किंवा थोडे अंतर गेल्यावर पायात तीव्र वेदना सुरू होतात. या वेदना विश्रांती घेतल्यावर कमी होत नाहीत. हे नसांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्याचं महत्त्वाचं लक्षण आहे.

Poor Blood Circulation | saam tv

पाय जड वाटणं

न चालताही पाय नेहमी जड आणि थकलेले वाटतात तर सावध व्हा. स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ही अवस्था होते. दीर्घकाळ उभं राहिल्यास हा त्रास अधिक वाढतो.

Peripheral Artery Disease | saam tv

पाय थंड पडणं

एका किंवा दोन्ही पायांमध्ये शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत थंडपणा जाणवतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. अनेकदा पाय सतत गार वाटतात आणि अस्वस्थता वाढते.

Blood Vessel Blockage | saam tv

जखम लवकर न भरणं

पायावर छोटी जखम झाली तरी ती बरी होण्यासाठी खूप वेळ लागतो. कारण त्या भागात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन कमी मिळतो. कधी कधी जखम वाढून संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो.

Heart Health | saam tv

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

Kolhapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा