Top 5 Superfoods Every Woman Must Eat for Better Health Freepik
लाईफस्टाईल

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

superfoods for women : महिलांनी आरोग्य टिकवण्यासाठी शतावरी, आवळा, नाचणी, तूप, काळे तिळ हे ५ सूपरफूड्स आहारात जरूर घ्यावेत. यामुळे उर्जा, हाडांचे आरोग्य, त्वचा आणि केस चमकदार राहतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अगदी लहानपणापासून ते वृद्धत्त्वापर्यंत स्त्रियांच्या शरिरात अनेक बदल होत असतात. याचे चांगले-वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत असतात. अशात आधुनिक काळातील स्त्रियांचे जीवन घर, मुल आणि चुल इथपर्यंतच मर्यादित राहीले नाही. त्यामुळे ऑफिस आणि रोजचा प्रवास यामुळे होणारी दगदगही आरोग्याच्या समस्यांचे कारण बनू शकते. यासाठी स्त्रियांच्या शरिराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. त्यामुळे शरिराला व्यायामासह पोषणयुक्त आहार मिळणे महत्त्वाचे ठरते.

असे अनेक सुपरफूड आहेत ज्यांचा समावेश स्त्रियांच्या आहारात असायलाच हवा. त्यातीलच एक सुपरफूड म्हणजे शतावरी. शतावरी स्त्रियांचे प्रजनन आरोग्य, मानसिक शांतता आणि हार्मोनल समतोल राखण्यासाठी अत्यंत फायदेशी ठरते. यामध्ये असलेले थंड गुणधर्म पोटातील उष्णतेचे प्रमाण कमी करते. जे मासिक पाळीच्या वेळेस होणारे मूड स्विंग्स आणि अति रक्तस्त्राव नियंत्रित ठेवते. याशिवाय काळे तिळ हार्मोनल समतोल राखण्यास तर मदत करतातच, यातील कॅल्शियम, आयरन आणि इतर पोषक तत्त्व हाडांना मजबूती देतात.

स्त्रियांना नेहमी आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्यातील व्हिटॅमिन सी त्वचा, केसांचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि पचन संस्थेसाठी उपयुक्त ठरते. शिवाय नाचणी देखील व्हिटॅमिन सी, ई आणि बी कॉम्पलेक्सने भरपूर असते. सारखा अशक्तपणा येत असल्यास तुमच्या आहारात नाचणीचा समावेश करणे उत्तम ठरते. तसेच तूप सौम्य गुणधर्माचे असल्यामुळे मानसिक ताण कमी करतं व त्वचेच्या समस्यांवरही काम करतं.

या सुपरफूड्सचा समावेश तुमच्या आहारात कसा कराल?

१. शतावरी - झोपण्याआधी एक ग्लास कोमट दूधातून घेऊ शकता.

२. काळे तिळ - भाज्यांमध्ये किंवा सॅलेडमध्ये गार्निश म्हणून वापरू शकता.

३. आवळा - रोज सकाळी आवळ्याचे सरबत किंवा गरम पाण्यातून आवळा पावडर घेऊ शकता.

४. नाचणी - नाचणीची भाकरी बनवू शकता.

५. तूप - जेवणामध्ये तेलाऐवजी तूप वापरू शकता. दूध, जायफळ आणि तूपाचे सुपरड्रिंक तयार करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT