Breast Pain : कमी इस्ट्रोजेनमुळे स्तनदुखी? महिलांनी दुर्लक्ष केल्यास वाढतो आरोग्याचा धोका

Women Health : महिलांमधील स्तनदुखी आणि कमी इस्ट्रोजेनची पातळी याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. कारणे, लक्षणे आणि योग्य काळजीबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
low estrogen symptoms
Women Healthgoogle
Published On

सध्या महिला पुरुषांच्या बरोबरीने कामे करतात. त्याचसोबत घर, मुलं यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळतात. त्यामुळे महिला स्वतःच्या आहार आणि जीवनशैलीकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांच्या या रोजच्या धावपळीमुळे त्यांच्या आरोग्याची गैरसोय झालेली असते असे आपण म्हणू शकतो. काही वेळेस स्तनांमध्ये होणारी वेदना, जळजळ किंवा खाज याकडे महिला दुर्लक्ष करतात. मात्र, स्तनातील कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणे हे महिलांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे शरीरात होणारे बदलही त्यात दुर्लक्षित होऊ शकतात.

काही महिलांना अधूनमधून स्तनामध्ये वेदना जाणवत असतात. ही वेदना सहन करण्यासारखी असल्यामुळे त्या ती किरकोळ समजून टाळतात. काहींना वाटतं की, स्तनांमध्ये होणारी वेदना शरीरात इस्ट्रोजेन हार्मोन कमी झाल्यामुळे होते. खरं तर, हार्मोनल बदलांमुळे होणारी स्तनदुखी प्रामुख्याने प्रोजेस्टेरॉनशी संबंधित असते. इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्याने थेट स्तनात वेदना होत नाहीत, मात्र हार्मोनल असंतुलनामुळे स्तनाच्या ऊती अधिक संवेदनशील होऊ शकतात.

low estrogen symptoms
Minimum Balance : खातेधारकांनो लक्ष द्या! 'या' तीन बँकांचा नवा नियम लागू, खात्यात 'इतकी' रक्कम नसेल तर लगेच बसणार दंड

विशेषतः पेरीमेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. यामुळे स्तनाच्या ऊतींची घनता कमी होऊन त्या अधिक तंतुमय होऊ शकतात, आणि त्यामुळे कधीकधी स्तनात वेदना जाणवू शकते. जर स्तनात संपूर्णपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय वेदना होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

स्तनदुखीची इतर कारणेदेखील असतात. मासिक पाळीपूर्वी हार्मोनल चढउतारांमुळे वेदना होणे ही सर्वात सामान्य बाब आहे. तसेच, स्तनाला झालेली दुखापत, खेळ किंवा अपघात, स्तनाची शस्त्रक्रिया यामुळेही वेदना होऊ शकतात. चुकीची ब्रा वापरणे देखील एक मोठं कारण आहे, विशेषतः व्यायाम करताना योग्य ब्राचा वापर करणे महत्त्वाचे आहे. स्तनपानाच्या काळात महिलांना वेदना, सूज किंवा स्तनाग्रांच्या समस्या जाणवू शकतात. काहीवेळा स्तनात मऊ गाठ जाणवणे ही सिस्टची लक्षणं असू शकतात, ज्यामुळे वेदना होऊ शकते. त्यामुळे स्तनदुखीकडे दुर्लक्ष न करता योग्य तपासणी करणे आणि आवश्यक उपचार घेणे हेच आरोग्यासाठी सुरक्षित आहे.

low estrogen symptoms
PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com