PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

EPFO : ईपीएफओच्या नियमांनुसार निवृत्तीपूर्वीही पीएफमधील रक्कम आपत्कालीन गरजा, गृहकर्ज, वैद्यकीय खर्च, शिक्षण आणि लग्नासाठी वापरता येते. यासाठी विशिष्ट अटी व प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
PF Withdrawal
EPF Saam Tv
Published On
Summary

वैद्यकीय खर्च, अपघात, गंभीर आजार, लग्न किंवा शिक्षणासाठी निवृत्तीपूर्वीही पीएफ रक्कम काढता येते का?

खाते ५ वर्षे जुने असल्यास प्लॉट किंवा घर खरेदीसाठी निश्चित मर्यादेत पीएफमधून पैसे काढू शकतो.

खाते १० वर्षे जुने असल्यास गृहकर्ज किंवा इतर मोठे कर्ज फेडण्यासाठी पीएफ रक्कम वापरता येते.

प्रत्येक परिस्थितीत ईपीएफओच्या अटी, मर्यादा व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे बंधनकारक असते.

अनेकांचा असा समज आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हा फक्त निवृत्तीनंतरच काढता येतो, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) विशिष्ट परिस्थितींमध्ये पीएफमधून रक्कम काढण्याची मुभा देते. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी किंवा मोठ्या आर्थिक गरजांच्या वेळी पीएफ खात्यातील बचत उपयोगी पडू शकते. यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार कितीही वेळा पैसे काढू शकता. यावर अद्याप कोणतेही ठोस बंधन नाही. मात्र, पूर्ण शिल्लक रक्कम फक्त नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर दोन महिने उलटल्यानंतरच मिळू शकते.

शिवाय घर, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठीही PF खात्याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी खातं किमान पाच वर्षे जुनं असणं आवश्यक आहे. प्लॉट खरेदीसाठी २४ महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता (डीए), घर किंवा फ्लॅट खरेदीसाठी ३६ महिन्यांचा मूळ पगार आणि डीए, किंवा खात्यातील व्याजासह एकूण शिल्लक , किंवा मालमत्तेची किंमत यापैंकी जी रक्कम कमी असेल ती काढता येते. हे पैसे थेट विक्रेत्याच्या किंवा संस्थेच्या खात्यातही जमा केले जाऊ शकतात, ज्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होतो.

PF Withdrawal
PM Modi : नेहरू-इंदिरांनाही मागे टाकत मोदींचा लाल किल्ल्यावरून नवा विक्रम; १०३ मिनिटांचा टप्पा पार

गृहकर्ज किंवा इतर मोठे कर्ज फेडण्यासाठीसुद्धा पीएफ मदत करू शकतो. यासाठी खाते किमान दहा वर्षे जुने असणे आवश्यक आहे. अशावेळी ३६ महिन्यांचा मूळ पगार आणि डीए, खात्यातील एकूण शिल्लक यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढता येते. मात्र, कर्ज फेडण्यासाठी बँक किंवा संबंधित वित्तीय संस्थेकडून थकबाकीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत मात्र कालमर्यादा नसते. गंभीर आजार, अपघात किंवा तातडीच्या उपचारांसाठी पीएफमधून सहा महिन्यांचा मूळ पगार आणि डीए किंवा कर्मचाऱ्याचा हिस्सा यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढता येते. यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणि नियोक्त्याची संमती आवश्यक असते.

पीएफचा वापर मुलांच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठीही करता येतो. यासाठी खाते किमान सात वर्षे जुने असावे लागते. या उद्देशासाठी कर्मचाऱ्यांच्या वाट्यापैकी ५०% रक्कम काढता येते. शिक्षणासाठी रक्कम काढताना शिक्षण संस्थेकडून अभ्यासक्रमाची व खर्चाची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते, तर लग्नाच्या बाबतीत संबंधित कुटुंबातील सदस्याचे नाते व कार्यक्रमाची माहिती पुरवावी लागते.

PF Withdrawal
Independence Day 2025 : पंतप्रधान मोदी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार, तर नेहरू आणि इंदिरा गांधींना किती वेळा मिळाला हा मान?

जर एखादा कर्मचारी अपघातामुळे किंवा आजारामुळे अपंग झाला, तर पीएफ खात्यातील रक्कम त्याला मोठा आधार देऊ शकते. अशावेळी सहा महिन्यांचा मूळ पगार आणि डीए, किंवा कर्मचाऱ्याचा हिस्सा, किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या उपकरणांची किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल ती मिळू शकते. डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे या प्रक्रियेत आवश्यक आहे. एकंदरीत, पीएफ हा केवळ निवृत्तीचा आर्थिक आधार नसून, जीवनातील विविध टप्प्यांवर आणि आव्हानांवर मात करण्यासाठी एक महत्त्वाचा आर्थिक स्त्रोत ठरू शकतो.

PF Withdrawal
Minimum Balance : खातेधारकांनो लक्ष द्या! 'या' तीन बँकांचा नवा नियम लागू, खात्यात 'इतकी' रक्कम नसेल तर लगेच बसणार दंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com