PM Modi : नेहरू-इंदिरांनाही मागे टाकत मोदींचा लाल किल्ल्यावरून नवा विक्रम; १०३ मिनिटांचा टप्पा पार

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून १०३ मिनिटांचे विक्रमी भाषण देत नवा इतिहास रचला, विकसित आणि स्वावलंबी भारताची दिशा स्पष्ट केली.
79th Independence Day India
Narendra Modi speechsaam tv
Published On

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतात स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त दरवर्षी भारताचे पंतप्रधान भाषण देतात. यंदा ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तब्बल १०३ मिनिटांचे भाषण देत इतिहास रचला. हे केवळ त्यांचे आतापर्यंतचे सर्वात लांब भाषण ठरले नाही, तर लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त दिलेल्या सर्वात मोठ्या भाषणाचा विक्रमही त्यांच्या नावावर गेला. यापूर्वीचा विक्रमही मोदींच्याच नावावर होता. २०२४ मध्ये त्यांनी ९८ मिनिटांचे भाषण दिले होते.

पंतप्रधानांची महत्वाची बाब म्हणजे त्यांनी सलग १२ वेळा लाल किल्ल्यावरून भाषण केले आहे. ज्यामुळे त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांना सुद्धा मागे टाकले. इंदिरा गांधींनी सलग ११ वेळा भाषण केले होते. तर पंडित जवाहरलाल नेहरूंचा १७ वेळेचा विक्रम अद्याप पहिल्या क्रमांकावर आहे. याचबरोबर, मोदी हे लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे दुसरे पंतप्रधान झाले आहेत.

79th Independence Day India
Independence Day 2025 : पंतप्रधान मोदी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार, तर नेहरू आणि इंदिरा गांधींना किती वेळा मिळाला हा मान?

भगवी पगडी परिधान करून आलेल्या मोदींनी विकसित भारताचा आराखडा मांडत, स्वावलंबी भारताच्या दिशेने सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचाही गौरव केला आहे. जे लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच घडले. अमेरिकेच्या व्यापार धोरणावर भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी पाठीशी उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

इतिहासात पाहता, नेहरू आणि इंदिरा गांधी यांची काही भाषणे सर्वात लहान होती. काहींच्या मते ती १४ मिनिटांची. तर वाजपेयींची काही भाषणे फक्त २५ ते ३० मिनिटांची होती. पण मोदींच्या भाषणांची लांबी सातत्याने वाढत गेली असून, यंदाचा १०३ मिनिटांचा विक्रम त्यांच्या राजकीय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

79th Independence Day India
Independence Day 2025 : १५ ऑगस्टसाठी पांढऱ्याऐवजी तिरंगा रंगाची साडी, पाहा हटके कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com