
भारतीय समाजातील पारंपरिक दृष्टिकोनाला धक्का देत, टाटा ट्रस्ट्सने मासिक पाळीबाबत समाजाची समज बदलण्यासाठी एक अनोखी आणि धाडसी जनजागृती मोहिम सुरू केलीये. भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. पण तरीही ही बाब अजूनही लज्जास्पद, अपवित्र समजली जाते आणि अनेक जुने गैरसमज आजही तग धरून आहेत. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ प्युबर्टी किंवा लग्नासाठी तयार असल्याचं लक्षण मानण्यात येतं. ७१% मुलींना पहिल्यांदा पाळी आली तेव्हाच तिची माहिती मिळते, या मोहिमेतून टाटा ट्रस्ट्स मासिक पाळी ही आरोग्याचं लक्षण आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
ही मोहीम झारखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील ग्रामीण भागातील सखोल सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासावर आधारित आहे. या अभ्यासातून असं स्पष्ट झालंय की, मासिक पाळीच्या स्वच्छतेसंदर्भात, व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अनेक महिलांना व किशोरवयीन मुलींना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनशैलीतील बंधनं प्रामुख्याने परंपरागत सामाजिक समजुतींमुळे निर्माण झाली आहेत.
बहुतेक वेळा मातांनी आपल्या मुलींशी पाळीविषयी संवाद न साधण्याचा कल असतो. कारण अनेक ठिकाणी पाळी सुरू होणं म्हणजे विवाहयोग्य वय गाठणं, असा गैरसमज आहे. अंगणवाडी कर्मचारीही अशा सामाजिक दडपणाची जाणीव व्यक्त करतात. पुरुषांमध्ये या विषयाविषयीची माहिती मर्यादित असली, तरी योग्य मार्गदर्शन दिल्यास ते सॅनिटरी पॅड आणणं किंवा वैद्यकीय मदतीसाठी घेऊन जाणं यांसारख्या गोष्टींसाठी सहकार्य मिळू शकतं.
ही मोहीम ‘सोशल अॅण्ड बिहेविअरल चेंज कम्युनिकेशन (SBCC)’ च्या दृष्टिकोनातून सात विविध राज्यांमध्ये अंमलात आणली जातेय. त्यासोबतच डिजिटलमध्येही ती उपलब्ध आहे. या अभियानाचे मुख्य आकर्षण म्हणजे एक गोड आणि लक्षात राहणारं जिंगल – ‘महिना आला’, जिथे "महिना" हा मासिक पाळीचा संकेत आहे. या गाण्यातून पुरुष आणि महिला दोघेही पाळी दरम्यान येणाऱ्या थकवा, पोटदुखी, चिडचिड यासारख्या लक्षणांना सहजतेने स्वीकारतात आणि त्याकडे आरोग्याच्या नैसर्गिक प्रक्रियेसारखं पाहतात.
यामधून लपवण्यासारखं किंवा लाज वाटण्यासारखं काहीही नाही. या उपक्रमाचा हेतू म्हणजे, मुलींना पहिल्यांदा पाळी आली तरी त्या अजूनही आपल्या बालपणात आहेत, हे समजायला हवं. त्याचप्रमाणे, स्त्रियांनी पाळीच्या काळात आत्मभान, माहिती आणि अभिमानाने जगावं, हा संदेशही देण्यात आला.
टाटा ट्रस्टच्या प्रमुख – पाणी, स्वच्छता आणि आरोग्य दिव्यांग वाघेला यांनी सांगितलं की, "अंघोळ, कपडे बदलणं किंवा पॅड्सची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा आणि खासगी जागांचा विश्वासार्ह अभाव मुलींना सुरक्षितता आणि सन्मानाने मासिक पाळी व्यवस्थापित करण्यास अडथळा ठरतो. पायाभूत सुविधा आणि निर्णय घेण्याचा अभाव ही समस्या अधिक गंभीर बनवतात. टाटा ट्रस्ट्सच्या मासिक पाळीविषयी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दीर्घकाळ चाललेल्या कामावर आधार घेत आणि आजही खोलवर रुजलेल्या अपसमज लक्षात घेऊन, आम्ही पायाभूत सुविधा, श्रद्धा प्रणाली, आणि त्यास कायम ठेवणाऱ्या सामाजिक वातावरणातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.या प्रक्रियेमुळे मुलींना मासिक पाळीकडे एक सामान्य आरोग्यप्रक्रिया म्हणून पाहता येईल, लपवून ठेवण्याची गोष्ट म्हणून नव्हे."
अशी एक मोहिम सुरू केली आहे, जी पारंपरिक दृष्टिकोनांना हादरवणारी आणि विचारधारा बदलणारी आहे: मासिक पाळीकडे लैंगिक परिपक्वतेचं नव्हे, तर आरोग्याचं सूचक म्हणून पाहिलं जावं. या मोहिमेच्या केंद्रस्थानी, सर्व चित्रफीतांमध्ये एकसंध धाग्यासारखी वापरलेली, एक लक्षवेधी जिंगल आहे – ‘महीना आ गया’. (या ठिकाणी ‘महीना’ म्हणजेच मासिक पाळी – “माझी पाळी आली आहे” असा अर्थ अभिप्रेत आहे.)
टाटा ट्रस्टच्या ब्रँड आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्स प्रमुख दीपशिखा सुरेंद्रन म्हणतात की, "या सामाजिक वर्तन बदल मोहीमेद्वारे, प्रत्यक्ष हस्तक्षेप आणि जनजागृतीपर चित्रफीतांच्या माध्यमातून, आम्ही समुदायांना मासिक पाळीचा आरोग्याचा सूचक म्हणून विचार करायला उद्युक्त करत आहोत, आणि लैंगिक परिपक्वतेसंबंधी चुकीच्या कल्पनांऐवजी सहानुभूतीने प्रतिसाद देण्याचं आवाहन करत आहोत. 'महीना आला' हे केवळ दिनदर्शिकेचं पान उलटणं नाही – ही एक प्रतीकात्मक कृतीची हाक आहे, जी कुटुंबांना मासिक पाळीचा अर्थ नव्याने विचार करण्यास उद्युक्त करते, आणि जी मासिक पाळीकडे पाहण्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सांस्कृतिक दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.