Sudden cardiac death saam tv
लाईफस्टाईल

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

Sudden cardiac death : सडन कार्डियाक डेथ म्हणजे हृदयाचं कार्य अचानक थांबल्यामुळे होणारा मृत्यू, ज्यामुळे हृदयाचे आणि मेंदूचे रक्तपुरवठा बंद होते आणि व्यक्ती बेशुद्ध पडून मृत्यूमुखी पडते. या आर्टिकलमधून सडन कार्डियाक डेथची कारणं, लक्षणं आणि मॅनेजमेंट समजून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

भारतात सडन कार्डियाक डेथच्या घटना वाढत आहेत, जी एक चिंताजनक बाब ठरत आहे . सध्या, जिममध्ये व्यायाम करताना, रस्त्यावर चालताना किंवा मैदानावर खेळताना, लग्नसमांरभात नाचताना अनेक तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो, जी एक चिंतेची बाब ठरत आहे.

सडन कार्डियाक डेथ म्हणजे नेमकं काय?

मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितलं की, सडन कार्डियाक डेथ म्हणजे हृदयाच्या असामान्य लयीमुळे हृदयाचे कार्य अनपेक्षितपणे थांबणं. हे हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा वेगळं असलं तरी हृदयविकारामुळे एससीडीचा धोका वाढू शकतो. आपत्कालीन उपचाराशिवाय यामुळे जगण्याची शक्यता खूप कमी होते. सडन कार्डियाक डेथ (SCD) ही एक गंभीर वैद्यकीय आणीबाणी आहे जिथे हृदय अचानक धडधडणं बंद करतं ज्यामुळे महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा बंद पडतो.

हे अनेकदा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय घडते आणि त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. बऱ्याच व्यक्तीना सडन कार्डियाक डेथची पूर्वी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे जागरूकता आणि जलद कृती करणे गरजेचे आहे.

कोरोनरी धमनी रोग (ब्लॉक केलेल्या रक्तवाहिन्या), मागील हृदयविकाराचा झटका,हार्ट फेल्युअर किंवा हृदयाचे स्नायू कमकुवत होणे, अनुवांशिक हृदय विकार (उदाहरणार्थ लॉन्ग क्यूटी सिंड्रोम), हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी, इलेक्ट्रोक्यूशन किंवा छातीत गंभीर दुखापत यामुळे होऊ शकते.

डॉ. भामरे पुढे म्हणाले की, हे समजून घेतलं पाहिजे की, अचानक हृदयविकारामुळे होणारा मृत्यू हे आधीच अस्तित्वात असलेल्या ब्लॉकेजेसमुळे उद्भवतं. हे हृदयातील ब्लॉकेज फुटल्यामुळे होतं ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचा झटका येतो किंवा वेंट्रिक्युलर एरिथमिया किंवा अगदी असामान्य हृदयाची लय, जसं की वेंट्रिक्युलर टाकीकार्डिया किंवा फायब्रिलेशन, जे बहुतेकदा अनुवांशिक कारणांमुळे उद्भवते. म्हणूनच, नियमित कार्डियाक तपासणी करुन प्रत्येकाने आपल्या हृदयाची स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे.

काय आहेत याची लक्षणं

  • लक्षणं

  • छातीत दुखणं किंवा अस्वस्थता

  • दम लागणे

  • चक्कर येणं

  • बेशुद्ध पडणं

  • छातीत धडधडणं

  • हृदयाचे ठोके जलद गतीने पडणं

  • अचानक चक्कर येऊन पडणं

यासंबंधित गुंतागुंत म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूचे नुकसान होणे आणि त्वरित उपचार न केल्यास मृत्यू ओढावू शकतो.

व्यवस्थापन कसं कराल?

अशा वेळी रुग्णाला वेळीच उपचाराची आवश्यकता भासते. ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत उपचारांना विलंब करू नका. ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AED) वापरून तात्काळ CPR (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) आणि डिफिब्रिलेशन हे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकते.

जोखीम असलेल्या रुग्णांना बीटा-ब्लॉकर्स किंवा अँटी-एरिथमिक औषधांची आवश्यकता भासू शकते. रुग्णाच्या परिस्थितीनुसार डॉक्टर उपचारांची पद्धत ठरवतील. याशिवाय, औषधोपचार, धूम्रपानाची सवय सोडणं, निरोगी आहाराचं सेवन करणं आणि नियमित व्यायाम करून रक्तदाब आणि मधुमेहाचे व्यवस्थापन केल्यास धोका कमी होतो. हृदयरोगाचा इतिहास असलेल्या किंवा अचानक मृत्यू ओढावण्याचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांनी नियमित हृदयाची तपासणी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT