Bhagavad Gita saam tv
लाईफस्टाईल

Bhagavad Gita: “कधी लढायचं आणि कधी मागे हटायचं?” भगवद्गीतेत दिलंय निर्णायक उत्तर

Bhagavad Gita when to fight when to retreat: भगवतगीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचे ते एक संपूर्ण तत्त्वज्ञान आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कामाच्या ठिकाणी वाद, नातेसंबंधातील तणाव, अपेक्षांचं ओझं अशा अनेक गोष्टींशी आपण झुंजत असतो. अशामध्ये हजारो वर्षांपूर्वी लिहिलेली भगवद्गीता आजही अनेकांना वाट दाखवते. ती आपल्याला शिकवते की स्पष्टतेने वागा, योग्य निवड करा.

तुमची खरी लढाई ओळखा

मुळात तुमच्या आयुष्यात खरी लढाई कुठे आहे हे जाणून घ्या. तुमच्या लढाया नेहमीच मोठ्या आवाजात नसतील. त्या एखाद्याच्या सततच्या टीकेशी असलेली शांत लढाई देखील असू शकते. इतकंच नाही तर अनेकदा ती न मानलेल्या अपेक्षांचं अदृश्य ओझं असू शकते किंवा सुरक्षित राहणं आणि धोका पत्करणं यातील अंतर्गत संघर्ष असू शकतो.

खरं तर ऊर्जा मर्यादित असते आणि प्रत्येक वाद, प्रत्येक राग, प्रत्येक अनियंत्रित प्रतिक्रिया ही शक्ती कमी करते. गीता आपल्याला आठवण करून देते ती, काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही हे ओळखणं.

जर परिणाम तुमच्या आयुष्याच्या मार्गावर होत नसेल, तर ती लढाई तुमची नाही. हा पहिला धडा आहे. त्यामुळे प्रत्येक वादळाला तोंड देण्याची गरज नाही. काही वादळे फक्त निघून जाण्यासाठी असतात. अशावेळी तुम्ही तुमची शक्ती जपून ठेवा.

गीतेनुसार कधी लढायचं?

जेव्हा ते तुमचं धर्मकर्तव्य असेल

जर एखादी लढाई तुमच्या कर्तव्याशी संबंधित असेल, तर गीता सांगते की, मागे हटू नका. अर्जुनाला युद्ध करण्यास याच कारणासाठी प्रेरणा दिली गेली. धर्मरक्षणासाठी केलेली लढाई पाप नसते.

जेव्हा अन्यायाविरुद्ध उभं राहणं आवश्यक असेल

अन्याय, शोषण किंवा चुकीच्या गोष्टींचा विरोध करणं हीच खरी लढाई आहे. कृष्ण सांगतात की, अन्यायाला पाठबळ न देणं म्हणजेच धर्माचं रक्षण.

जेव्हा मौन धरणं म्हणजे चूक वाढवणं ठरू शकतं

काही प्रसंगी शांत राहणं म्हणजे चुकीला खतपाणी घालणं ठरतं. अशावेळी गीता म्हणते, योग्य ते ठामपणे सांगा, संघर्ष टाळू नका.

स्वतःच्या किंवा इतरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल

जर एखादी व्यक्ती तुमच्या किंवा कोणाच्या सुरक्षेला धोका असेल, तर लढाई आवश्यक ठरते. अशा प्रसंगी पाठी हटणं म्हणजे दुर्बलता.

गीतेनुसार कधी दूर जायचं?

संघर्ष अहंकारातून निर्माण झाला असेल

अहंकार, राग किंवा सूडभावनेतून केलेली लढाई गीता निष्फळ मानते. अशा परिस्थितीत दूर जाणं हेच शहाणपण ठरतं.

जेव्हा समोरचा विवेकाने ऐकण्यास तयार नसेल

कृष्ण सांगतात, ज्याला सत्य समजणार नाही, त्याच्यासोबत वाद घालू नका.” हट्टी लोकांपासून दूर जाणं हेच उत्तम.

जेव्हा शांतता, सन्मान आणि मानसिक स्थैर्य धोक्यात येतं

तुमच्या मन:शांतीला तडा जात असेल, भावनिक नुकसान होत असेल, तर गीतेनुसार अशी परिस्थिती सोडून जाणं हेच योग्य. स्वत:चा सन्मान जपणं ही देखील एक लढाईच आहे.

टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Male Fertility Decline: तुमच्या जेवणामध्ये असलेल्या 'या' एका घटकाने पुरुषांचा कमी होतो स्पर्म काउंट

Maharashtra Live News Update: खेड पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा

SCROLL FOR NEXT