Budh Nakshatra Gochar: सप्टेंबर महिन्यात बुध करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Budh Nakshatra Gochar 2024: सप्टेंबर महिन्यात बुध दोनदा आपली राशी बदलणार आहे. बुध विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. यावेळी अशा दोन राशी आहेत, ज्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.
Budh Nakshatra Gochar
Budh Nakshatra Gochar
Published On

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह राशीशिवाय त्यांच्या नक्षत्रात देखील बदल करतात. ग्रहांचा राजकुमार बुध हा सुमारे 26 दिवसांनी तयांची राशी बदलतो. सप्टेंबर महिन्यात बुध दोनदा आपली राशी बदलणार आहे. बुध विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतो.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, सप्टेंबरच्या सुरुवातीला बुध मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. केतू नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. मात्र यावेळी अशा दोन राशी आहेत, ज्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

पंचांगानुसार बुध ग्रह 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11:52 वाजता मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी तो 14 सप्टेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. 27 नक्षत्रांपैकी मघा नक्षत्र हे दहावं नक्षत्र आहे.

Budh Nakshatra Gochar
September Grah Gochar: सप्टेंबर महिन्यात बुध, सूर्यासह ३ ग्रह बदलणार रास; 'या' राशींचं नशीब फळफळणार

मेष रास (Mesh Zodiac)

बुधा ग्रहाचं मघा नक्षत्रात प्रवेश करणं मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येणार आहे. यासोबतच तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात खूप फायदा होणार आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू शकणार आहे. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

मघा नक्षत्रात बुधाचं गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. व्यवसायातही भरपूर नफा मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. या काळात तुम्हाला परदेशातून चांगली बातमी मिळू शकणार आहे. कुटुंबामध्ये असलेले वाद संपुष्टात येतील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Budh Nakshatra Gochar
Chanakya Niti: पुरुषांनी 'या' 4 गोष्टी कोणासोबतही शेअर करू नये; आयुष्यभर कराल पश्चात्ताप!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com