WhatsApp Voice Chat  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsAppच नवं फीचर! एकाच वेळी 100 हून अधिक ग्रुप मेंबरशी करता येणार व्हॉईस चॅट, कसे वापराल?

WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी, मेटा ने एक नवीन व्हॉईस चॅट फीचर लाँच केले आहे जे लाइव्ह व्हॉईस चॅटिंगसारखेच आहे.

Shraddha Thik

WhatsApp Voice Chat :

व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फीचर जाहिर केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी, मेटा ने एक नवीन व्हॉईस चॅट फीचर लाँच केले आहे जे लाइव्ह व्हॉईस चॅटिंगसारखेच आहे. जरी ते ग्रुप व्हॉइस कॉलपेक्षा बरेच वेगळे असेल. ग्रुप व्हॉईस चॅट सुरू केल्यानंतर, ग्रुपमधील सर्व मेंबर्सना त्यात भाग घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला व्हॉईस चॅटचे नोटिफीकेशन मिळेल पण ती Silent राहील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा मोठा फायदा (Benefits) म्हणजे लोक कामात व्यस्त असल्यास ग्रुपमध्ये व्हॉईस नोट्स टाकू शकतील. जर आपण उदाहरणासह समजून घेण्याचा प्रयत्न केला तर, जर व्हॉट्सअ‍ॅपप व्हॉईस चॅट चालू असेल आणि एखाद्याला त्या कॉलमधून बाहेर पडावे लागले, तर त्या माइकवर टॅप करून व्हॉइस नोट सोडू शकता.

कॉल (Call) संपल्यानंतर सर्व मेंबर्सना ही नोट ऐकता येईल. व्हॉइस चॅटमध्ये, कोणताही युजर कधीही भाग घेऊ शकतो आणि बाहेर पडू शकतो. व्हॉईस चॅटिंगदरम्यानही यूजर्स मेसेज पाठवू शकतील.

व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस चॅट कसे सुरू करावे?

  • तुम्हाला ज्या ग्रुपसोबत व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) व्हॉईस चॅट करायचे आहे तो ग्रुप उघडा.

  • आता स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या फोन आयकॉनवर क्लिक करा.

  • आता व्हॉइस चॅट सुरू करण्यासाठी टॅप करा.

  • यानंतर, सर्व ग्रुप मेंबर्सना Silent एक नोटिफीकेशन मिळेल ज्यावर क्लिक करून ते भाग होऊ शकतील.

  • ग्रुप व्हॉइस चॅटमधून बाहेर पडण्यासाठी रेड क्रॉस बटणावर क्लिक करा.

व्हॉट्सअ‍ॅपने नोंदवले आहे की नवीन व्हॉइस चॅट हे फीचर मल्टीटास्किंगला सपोर्ट करते, ज्यामुळे युजर्सना कॉल नियंत्रित करता येतो आणि त्याच वेळी महत्त्वाची माहितीही पाठवता येते. ते एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड देखील आहेत, याचा अर्थ फक्त तुम्ही आणि इतर सहभागी संभाषण पाहू आणि ऐकू शकतात.

विशेष म्हणजे, WhatsApp येत्या आठवड्यात iOS आणि Android डिव्हाइसवर 33 ते 128 सहभागी असलेल्या ग्रुप्ससाठी व्हॉईस चॅट आणत आहे. 33 पेक्षा कमी मेंबर्स असलेले ग्रुप्स हे फीचर्स वापरू शकणार नाहीत, कारण ते व्हॉट्सअ‍ॅपचे ग्रुप व्हॉईस कॉल हे फीचर वापरू शकतात. याव्यतिरिक्त, एकदा प्रत्येकाने चॅट सोडल्यानंतर किंवा 60 मिनिटांसाठी चॅटमधील पहिल्या किंवा शेवटच्या व्यक्तींपैकी कोणीही व्हॉईस चॅट कट केल्यास संपुर्ण चॅट आपोआप समाप्त होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT