Shocking News :150 कॉल उचलले नाहीत; 230KM प्रवास करून पोलीस कॉन्स्टेबलनं माहेरी असलेल्या बायकोला क्रूरपणे संपवलं

Crime News: केवळ संशयानं अख्खा संसार आणि एखाद्याचं उद्ध्वस्त होऊ शकतं हे बेंगळुरूतील घटनेनं समोर आलं आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Bengaluru Crime News :

केवळ संशयानं अख्खा संसार आणि एखाद्याचं उद्ध्वस्त होऊ शकतं हे बेंगळुरूतील घटनेनं समोर आलं आहे. दीडशे फोन कॉल करूनही उचलले नाहीत म्हणून चारित्र्यावर संशय घेत पोलीस कॉन्स्टेबलनं आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. या दाम्पत्याला अवघं ११ दिवसांचं बाळ असून, ते आता पोरकं झालं आहे.

कर्नाटकातील होसकोटेजवळ कलाथूर गावात सोमवारी सकाळी ही भीषण घटना घडली. प्रतिभा (वय २४) असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. ती आपल्या माहेरी होती. तिला ११ दिवसांचं बाळ होतं. आरोपी किशोर डी. (वय ३२) हा कामराजनगरमधील रामासामुद्रा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पत्नीच्या हत्येपूर्वी त्यानंही किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची प्रकृतीही गंभीर असून, त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

होसकोटे पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयातून सोडल्यानंतर आरोपी किशोरला ताब्यात घेणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

बीई कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतलेल्या प्रतिभाचं लग्न किशोरसोबत नोव्हेंबर २०२२ मध्ये झालं होतं. किशोर मूळचा कोलार जिल्ह्यातील वीरपुरा येथील रहिवासी आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर प्रतिभाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिचे कॉल्स आणि मेसेज नेहमी चेक करायचा. तिला मेसेज करणाऱ्या आणि तिच्याशी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर संशय घ्यायचा. प्रतिभाचे कॉलेजमधील अनेक मित्रांशी जवळचे संबंध असल्याचा आरोपही तो करायचा.

Crime News
Crime News: पती स्मार्ट दिसत नसल्यानं पत्नीचं भयंकर कृत्य; नवऱ्याला दिलं पेटवून

किशोरने रविवारी सांयकाळी प्रतिभाला फोन केला. काही कारणांवरून तिच्याशी वाद घातला. ती रडायला लागली. तिच्या आईनं फोन घेतला आणि बंद करून ठेवून दिला. अशीच रडायला लागलीस तर मुलाच्या आरोग्यावर परिणाम होईल, असे ती म्हणाली. पुन्हा कॉल उचलू नको, असं तिनं प्रतिभाला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी किशोरने 150 कॉल केल्याचे प्रतिभाने पाहिले. प्रतिभाने हे तिच्या आईवडिलांना सांगितले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, किशोर सकाळी 11.30 च्या सुमारास प्रतिभाच्या घरी आला. त्यावेळी प्रतिभा आणि बाळ घरात पहिल्या मजल्यावर होते. तर तिची आई टेरेसवर गेली होती.

Crime News
Pune Crime News : जागरुक नागरिकांमुळे पाच सशस्त्र दरोडेखोर अटकेत; 5 तोळे सोने, 18 किलो चांदीसह 2 लाख 22 हजार हस्तगत

किशोर आधी किटकनाशक प्यायला. त्यानंतर दाराची कडी आतून लावली. त्याने प्रतिभाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिची आई टेरेसवरून खाली आली. तिने दरवाजा ठोठावला. परंतु आतून काहीच आवाज आला नाही. काहीतरी भयानक घडलंय अशी तिला शंका आली. तिनं जोरजोरात दार ठोठावण्यास सुरुवात केली. किशोरला दरवाजा उघडण्यास सांगितले. 15 मिनिटांनी त्याने दरवाजा उघडला.

मी तिला मारलं असं ओरडत तो घरातून पसार झाला. प्रतिभाच्या हत्येच्या घटनेनं अख्ख्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. किशोरला जन्मठेप व्हायला हवी, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली. किशोरची आई माझ्या मुलीचा छळ करत होती, असा आरोपही त्यांनी केला. वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी किशोरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
The Burn Restaurant: वांद्र्यातील 'द बर्न' रेस्टॉरंटला व्यवसाय बंद करण्याचे निर्देश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com