Informative News Saam Tv
लाईफस्टाईल

Best before And Use By Date म्हणजे काय रं आबा? काय असतो बरं दोघांमधील फरक?

Informative News: आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू आहेत. ज्या वस्तू संंबंधित अनेक आश्चर्यकारक माहिती समोर येत असते. अशातच आज तुम्हाला एक वेगळी माहिती तुम्हाला सांंगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिन्या अखेरीस प्रत्येकाच्या घरी आवश्यक सामान बाजारातून घेण्याची धावपळ सुरु असते. आधीच्या काळी घरातील सर्व आवश्यक वस्तु घेण्यासाठी विशिष्ट असे एक किंवा दोनच दुकान असत, जेथून आपल्याला सर्व खाद्यपदार्थ असतील किंवा घरातील वापरातल्या वस्तू विकत मिळत असत. विकत घेतलेल्या वस्तू कायम उत्कृष्ट दर्जाच्या असत. मात्र जस- जसा काळ बदलत गेला अनेक वस्तू विकत घेण्याची दुकान बदलली आणि अनेक दुकाने नव्याने स्थापन झाली.

काही काळाआधी गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू घरात बनवत असत किंवा बाजारातून मोजक्या वस्तूच आणत असत. महत्त्वाचे म्हणजे दुकानातील वस्तू वापरण्यासाठी मोजकेच नागरिक असत. त्यामुळे दुकानातील असलेल्या कोणत्याही वस्तू खराब होण्याचे टेंशन (Tension) नसत. मात्र जस- जसा काळ बदलत गेला. प्रत्येक क्षेत्रात बदल होत गेला. बाजारात अनेक खाद्य पदार्थांच्या वस्तू पॅक बंद स्वरुपात मिळण्यास सुरुवात झाली. कारण खाद्य पदार्थांपासून ते प्रत्येक क्षेत्रातील वापरात येणाऱ्या वस्तू मोठ- मोठ्या कंपनीत बनण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्या वस्तू अनेक शहरातील लहान लहान दुकानापासून ते मॉलमध्ये मिळण्यास सुरुवात झाली.

दरदिवशी मोठ्या संख्येने ग्राहक अनेक वस्तुची खरेदी करत असतात. मात्र अनेकदा या वस्तूची ''एक्सपायरी डेट'' संपल्याने अनेक ग्राहक वस्तू परत करण्यासाठी येत असतात. अनेकवेळा टीव्हीवरील जाहिरातीमधून आपल्याला जागरुक राहण्याचा सल्ला दिला जातो, ज्या जाहिरामध्ये कोणतीही वस्तू घेताना ''एक्सपायरी डेट'' (Expiration date) तसेच ''बेस्ट बिफोर'' शिवाय ''यूझ बाय डेट'' या महत्त्वाच्या गोष्टी पाहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यामधील फरक तुम्हाला माहिती आहे का?

एक्सपायरी डेट'' तसेच ''बेस्ट बिफोर'' शिवाय ''यूझ बाय डेट'' या तिन दिलेल्या गोष्टी प्रत्येक ग्राहकांना एकच आहेत असे वाटते. मात्र या तिन्हींचा गोष्टीचा अर्थ (Meaning) आणि महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. जेव्हा ही तुम्ही शॉपिक मार्टमध्ये कोणतीहे खाद्य पदार्थ विकत घेता तेव्हा त्या वस्तूच्या एका बाजूला ती वस्तू किती दिवस वापरता येऊ शकते, असे विशिष्ट स्वरुपात लिहिलेले असते. या वस्तूमध्ये कधी औषध (medicine) तर कधी सौदर्यंप्रसाधणच्या वस्तू आणि खाद्य पदार्थ, असे या तिन गोष्टीवर ''एक्सपायरी डेट'' तसेच ''बेस्ट बिफोर'' शिवाय ''यूझ बाय डेट'' लिहिलेले असते. चला तर आज जाणून घेऊयात या तिन्ही गोष्टीमधील संपूर्ण फरक.

एक्सपायरी डेट

प्रत्येक विकत घेतलेल्या वस्तूवर एक्सपायरी डेट म्हणून एक तारीख (date) लिहिलेली असते. ज्याचा अर्थ त्या दिलेल्या तारखेनंतर आपण घेतलेले उत्पादन वापरणं आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरु शकत. दिलेल्या एक्सपायरी डेटनंतर उत्पादन (Production) खराब होऊ शकत. जर तुम्ही एखादे औषध किंवा सौदर्यप्रसाधानांपैकी कोणतीही वस्तू एक्सपायरी डेटनंतर वापरली तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

बेस्ट बिफोर याचा अर्थ काय?

एक्सपायरी डेटसोबत अनेक वेळेस खाद्य (Food) पदार्थांच्या वस्तूवर तुम्हाला ''बेस्ट बिफोर'' असे लिहिलेले दिसून येईल. मात्र याचा अर्थ नेमका काय? हा विचार तुम्हाला आलाच असेल. मात्र जाणून घ्या की, बेस्ट बिफोर अर्थात, विकत घेतलेल्या पदार्थांची चव (Chav) एकून पदार्थांची गुणवत्ता एक्सपायरी डेट गेल्यानंतरही चांगली राहू शकते. याला वस्तूची ''बेस्ट बिफोर डेट'' म्हणतात.

यूझ बाय डेट

यूझ बाय डेट यालाही एक्सपायरी डेट असेही म्हणतात. मात्र यूझ बाय डेटमध्ये तुम्हाला वस्तूवर (Objects) दिलेल्या तारीखेनंतर ती वस्तू अजिबात खाण्यास मनाई असते. जर तुम्ही त्या पदार्थाचे किंवा वस्तूचे यूझ बाय डेट वापर (Usage) केलात, तर तुम्हाला आरोग्यास मोठी हानी पोहचण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT