Lifestyle For Slow Ageing : दिवस, महिने आणि वर्षांनुसार व्यक्तीचे वय वाढतच जाते. अशातच वाढत्या वयामुळे माणसांच्या तरुणाईमध्ये थोडा बदल जाणवतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या किशोरअवस्थेमध्ये त्याला असे वाटते की तो अजून सुद्धा 20 वर्षाचा आहे.
परंतु 30 वय ओलांडल्यानंतर शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. त्यामुळें तिशीच्या नंतर प्रत्येकाने आपल्या खानपानामध्ये आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
आज आम्ही तुम्हाला तिशीच्यानंतर कोणती खाद्यपदार्थ खायला पाहिजे आणि कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळायला पाहिजे हे सांगणार आहोत.
1. फ्लेवर दही आणि योगर्ट :
अनेक लोक गोड खाण्यापासून लांब राहण्यासाठी आईस्क्रीम, मिठाई, कँडी, चॉकलेट्स, कुकीज यांसारख्या अनेक प्रकारच्या गोष्टी खाण्याचे टाळतात. परंतु वास्तवमध्ये ते स्वतःला धोका देतात. खरंतर ब्रेड, टोमॅटो केचप, फ्लेवर योगर्ट यांसारख्या पदार्थांमधून कळत नकळत आपल्या शरीरात गोड पदार्थ जातात. आपल्याला असे वाटते की आपण गोड खात नाही आहोत. परंतु आपण स्वतःलाच फसवत असतो. या सगळ्या पदार्थांमध्ये एक आईस्क्रीम बनवायला लागणाऱ्या साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे हे पदार्थ खाण्यापासून स्वतःला वाचवा.
2.डबाबंद असलेले सूप :
कोणत्याही व्यक्तीसाठी दिवसातून पाच ग्रामपेक्षा जास्त जास्त मिठ खाणे हे अतिशय हानिकारक असते. सगळ्यांनी पुर्ण दिवसातून 2,300 ग्रामपेक्षा कमी सोडियमचं सेवन केलं पाहिजे. अशातच बाहेरच्या बंद जेवणामधून तुमच्या शरीरात 40 टक्के सोडियम जाते. त्याचबरोबर तुम्ही एका दिवसामध्ये दोन ते तीन वेळा (Time) बाहेरच्या जेवणाचे सेवन केले तर तुमच्या शरीरात (Health) गरजेपेक्षा जास्त सोडियमचे प्रमाण वाढते. एवढेच नाही तर अनेक बंद सूपमध्ये बीपिए या नावाच केमिकल असतं. ज्यामुळे कॅन्सर, वजन वाढणे, गुडघे दुखणे यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. .
3. कोल्ड ड्रिंक्स :
कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेल्या गोष्टी आपल्या शरीराला इजा पोहचवू शकतात. या ड्रिंक्समध्ये जास्त प्रमाणात साखर (Sugar) उपलब्ध असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील शुगरचे प्रमाण तर वाढतेच. त्याचबरोबर महिलांमधील ओव्यूलेशनवर याचा प्रभाव पडतो आणि पुरुषांच्या शुक्राणूवरती देखील प्रभाव पडतो. कोल्ड ड्रिंक्स हे महिलांना गर्भधारणेसाठी अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर पुरुषांना देखील याचा त्रास होऊ शकतो.
4. कॉकटेल आणि बियर :
आहार विशेषतज्ज्ञांनी सांगितले आपले शरीर वाढत्या वयामुळे दारु पचवू शकत नाही. दारू आपल्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसन पोहोचवू शकते. तुमचे शरीर 20 ते 30 या वयोगटामध्ये जसे काम करते. तसे 30 वयाच्यानंतर काम करू शकत नाही. हे सत्य सगळ्यांनी स्वीकारायला हवे.
5. व्हाईट ब्रेड :
ब्रेकफास्टमध्ये व्हाइट ब्रेड खाणे हे अगदी कॉमन झाले आहे. व्हाईट ब्रेडचं सेवन नियमीत केल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. यामध्ये रिफाइंड कार्बोहाइड्रेटची मात्रा जास्त प्रमाणत असते. जो शरीरामध्ये फॅटच्या रूपामध्ये जमा होते. त्याचरोबर व्हाइट ब्रेडमुळे शुगर देखील वाढते.
6. हाय सोडियम चायनीज फूड :
आपल्या सगळ्यांनाच हे माहित आहे की चायनीज कॉर्नरवरती मिळणाऱ्या चायनीजमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते. चायनीजमधील जास्त सोडियमचे प्रमाण तुमच्या त्वचेमधील मॉस्चर खेचून घेऊ शकते. त्याचबरोबर तुमचं ब्लड प्रेशर देखील वाढू शकते. कोरडी त्वचा तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारं बनवू शकते.
7. आईस कॉफी :
आईस कॉफी ही तुमच्या त्वचेला दुप्पटीने वय वाढवते. दिवसभर आपली त्वचा युवी किरणांच्या संपर्कामध्ये असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला भरपूर प्रमाणात नुकसान पोहोचते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील कोशिका स्वतःहून त्यांचे काम करत असतात. परंतु कॉफीच्या सेवनाने आपल्याला झोप येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय शुगर फ्री खाद्यपदार्थ, डब्बाबंद फळे, वेटलॉस बार, फ्रोजन फुड, स्पोर्ट्स ड्रिंक्स, चिप्स वेफर्स आणि डब्बाबंद कॉफी किंवा आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी भरपूर वर्ष पॅकेटमध्ये दुकानात ठेवलेले असतात. या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागेलं. त्यामुळे असे पदार्थ खाण्याचे टाळा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.